सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांनाच सभापतींनी असे सांगावे लागणे दुर्दैवी !

पणजी, १० मार्च (वार्ता.) – गोवा विधानसभेच्या सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसर्या दिवशी सभापती डॉ. गणेश गावकर यांनी मंत्र्यांनी ९ मार्च या दिवशी सभागृहात केलेल्या वर्तनाविषयी अप्रसन्नता व्यक्त केली आणि असे यापुढे न करण्याची मंत्र्यांना चेतावणीही दिली.
अधिवेशनात १० मार्च या दिवशी सकाळी ११.३० वाजता कामकाजाला प्रारंभ होताच सभापती डॉ. गणेश गावकर म्हणाले, ‘‘सभागृहात मंत्र्यांकडून सातत्याने आवाज चढवून बोलणे, समोरच्या सदस्याला टोमणे मारणे, उपहासात्मक बोलणे आणि वैयक्तिक पातळीवर आरोप करणे, असे प्रकार वाढले आहेत. हे वर्तन संसदीय लोकशाहीला शोभणारे नाही. हे वर्तन पूर्णपणे अनैतिक आहे.’’ सभापती डॉ. गणेश गावकर यांनी या वेळी राज्यघटनेच्या तिसर्या अनुसूचीचा उल्लेख करत मंत्र्यांना त्यांच्या शपथेची आठवण करून दिली. ते पुढे म्हणाले, ‘‘सभागृहात सदस्यांना उद्देशून केलेली आरडाओरड आणि वैयक्तिक टीका शपथेच्या पूर्णपणे विरोधात आहे. अशा वर्तणुकीमुळे सभागृहाची प्रतिष्ठा मलिन होते.’’
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वाल्हे येथे उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन !
आषाढी यात्रेसाठी ५ सहस्र ५०० विशेष बसगाड्यांची सुविधा ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
मोशी येथील कचरा आगार दुर्घटनेच्या संदर्भात आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी