अहिल्यानगर : श्री क्षेत्र मढी कानिफनाथ यात्रेत लागली मुसलमानांची दुकाने !

ग्रामपंचायतीच्या विरोधानंतरही देवस्थानच्या विश्वस्तांकडून मुसलमान व्यावसायिकांना गाळे

श्री क्षेत्र मढी कानिफनाथ

पाथर्डी (अहिल्यानगर) – पाथर्डी येथील श्री क्षेत्र मढी कानिफनाथ यात्रेत मुसलमान व्यावसायिकांना दुकाने लावू न देण्याच्या भूमिकेवर मढी ग्रामपंचायत आक्रमक झाली होती. पावित्र्य पाळले जात नाही, असे सूत्र पुढे करत ग्रामपंचायतीत याविषयी ठराव संमत करण्यात आला होता. हे सूत्र गेल्या वेळीच न्यायालयात गेले होते. यावर्षीही मुसलमान व्यावसायिकांना विरोध करण्यात आला होता.

त्या अनुषंगाने सकल हिंदु समाजाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांची मढी येथे सभा आयोजित केली होती. गावातील मुसलमानांना यात्रेत दुकाने लावण्यास मढी ग्रामपंचायतीने अनुमती नाकारली आहे; पण देवस्थानच्या विश्वस्तांनी देवस्थानांच्या मालकीचे गाळे मुसलमान व्यावसायिकांना देत व्यवसायाला मुभा दिली. यावरून माजी सरपंच संजय मरकड यांनी ’हे मुसलमान व्यावसायिक देवस्थान विश्वस्तांचे नातेवाईक असतील’, असा आरोप केला आहे.

संपादकीय भूमिका

ज्यांना हिंदूंच्या देवावर उधळलेला गुलाल अंगावर पडलेला चालत नाही, त्यांना देवाच्या यात्रेत व्यवसाय करून कमावलेले पैसे कसे चालतात ?