
नांदेड – सध्या मध्यपूर्व आणि काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारतात पेट्रोलचा तुटवडा जाणवणार आहे अन् पेट्रोलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत, अशी अफवा जनतेमध्ये पसरत आहे. या अफवेमुळे नांदेड जिल्हा, तसेच शहरामधील विविध पेट्रोल पंपांवर नागरिकांनी अनावश्यक गर्दी केली. तरी पेट्रोल किंवा डिझेलचा कोणताही तुटवडा नाही, तसेच इंधनदर वाढीचा कोणताही प्रस्ताव शासनाकडे प्राप्त नाही. ही माहिती पूर्णपणे खोटी असून नागरिकांनी अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही प्रकारच्या अप्रमाणित वृत्तांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहिती केवळ शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमांतूनच स्वीकारावी. नांदेड जिल्ह्यात इंधनसाठा सुरळीत असून पुरवठा नियमित पद्धतीने चालू आहे. त्यामुळे पेट्रोल/डिझेल भरण्यासाठी गडबड करून गर्दी करू नये.
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
महाराष्ट्रात ८ प्रमुख शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा विकास केंद्र उभारणार !
‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये यापुढे दारूला अनुमती नाही ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
Data Centers : अमर्याद ‘डेटा सेंटर्स’मुळे उद्भवणार्या जलसंकटाविषयी विधान परिषदेत पडसाद !