गोव्यात बनावट मद्याची तस्करी होत असल्याचा आरोप !

मुंबई – कोल्हापूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातील १८ अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगनमताने गोव्यात बनावट मद्याची तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सांगली अधीक्षकांकडून चौकशी चालू असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्कमंत्री सुनेत्रा पवार यांनी लेखी उत्तरात दिली आहे. (ज्या विभागावर बनावट मद्य पकडण्याचे दायित्व आहे, त्या विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरच जर तस्करी केल्याचा आरोप होत असेल, तर ते गंभीर आहे ! अशा प्रकारणाचे अन्वेषण लवकरात लवकर संपवून असे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे ! – संपादक)
विधान परिषदेचे काँग्रेसचे आमदार जयंत आसगावकर आणि सतेज पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना ही माहिती दिली आहे. मार्च २०२५ मध्ये कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाद्वारे एक मोठी तस्करी उघडकीस आली होती. यातील एका खासगी व्यक्तीने सरकारी गणवेश परिधान करून तो उत्पादन शुल्क विभागाचा कर्मचारी असल्याचे भासवले आणि गोव्यात बनावट मद्यतस्करी केली. या प्रकरणी गडहिंग्लज न्यायालयात २३ डिसेंबर २०२५ या दिवशी दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाहा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार नव्हे काय ? |
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !