
शिर्डी (अहिल्यानगर) – मागील काही दिवसांपासून काही व्यक्ती सामाजिक माध्यमांतून साईबाबा यांच्याविषयी वादग्रस्त विधाने करत असल्याची तक्रार भक्तांनी संस्थानकडे केली होती. यापूर्वी उत्तर भारतातील काही व्यक्तींनी साईबाबा यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला होता. यानंतर साईबाबा संस्थानने १५ व्यक्तींच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद केले होते. यासह राहाता न्यायालयात दावेही प्रविष्ट (दाखल) केले आहेत, अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. साईबाबा यांच्याविषयी चुकीची माहिती पसरवणार्या लोकांना थेट घरी जाऊन साईबाबा संस्थान नोटीस बजावणार आहे. २७ फेब्रुवारीला साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी नोटीस देण्यासाठी गेले होते.
तमिळनाडू, तेलंगाणा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील लोक सामाजिक माध्यमांवर साईबाबा यांच्याविषयी चुकीची माहिती पसरवत असल्याच्या तक्रारी संस्थानकडे आल्या होत्या. संस्थानने याची निश्चिती केल्यानंतर १० जणांच्या विरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !