गुरु तेग बहादूर यांचा ३५० वा शहीद समागम

नाशिक – शीख धर्माचे नववे गुरु म्हणजेच गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीद समागम वर्षानिमित्त नाशिक महानगरपालिकेने ‘हिंद दी चादर’ (भारताची ढाल) या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सोहळ्याच्या नियोजनासाठी शहरातील सर्व गुरुद्वारा पदाधिकार्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीला महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
येत्या २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दिवशी हा सोहळा साजरा होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बैठकीत वाहतूक, समन्वय, भोजन व्यवस्था, आरोग्य सुविधा आदी सूत्रांवर चर्चा करण्यात आली. गुरु तेज बहादूर यांनी धार्मिक स्वातंत्र्यासाठी वर्ष १६७५ मध्ये देहली येथे दिलेले बलीदान संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांना ‘हिंद दी चादर’ (धर्मरक्षक) म्हणून ओळखले जाते. त्यांच्या शौर्य आणि त्यागाचा जागर या कार्यक्रमाच्या केला जाणार आहे.
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक