पुणे विमानतळावरून होणार्‍या आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमध्ये ७४ टक्के वाढ !

पुणे विमानतळ

पुणे – पुणे विमानतळ हे पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून उदयास येत आहे. वर्ष २०२४ च्या तुलनेत वर्ष २०२५ मध्ये पुणे विमानतळावरून होणार्‍या आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमध्ये ७४ टक्के, तर प्रवाशांच्या संख्येत ६४ टक्के वाढ झाली आहे. २०२५ या वर्षात ३ लाख ३८ सहस्र ७७० प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला. पुणे विमानतळावरून दुबई, सिंगापूर आणि बँकॉक या आंतरराष्ट्रीय शहरांसाठी थेट विमान सेवा उपलब्ध आहे. युरोप आणि अमेरिकेसाठीही विमानसेवा चालू करण्याची मागणी वाढत आहे. प्रवासी आणि विमान उड्डाणांच्या संख्येत झालेली वाढ विमानतळाच्या विस्तार धोरणाचे यश आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन भविष्यात आणखी आंतरराष्ट्रीय शहरांशी पुणे जोडण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी सांगितले.