हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांना वाढदिवसानिमित्त सनातननिर्मित प्रभु श्रीरामाची सात्त्विक प्रतिमा भेट

डावीकडून सर्वश्री सौरभ चॅटर्जी, कमल बिस्वाल, प्रभु श्रीरामाची प्रतिमा स्वीकारतानां छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय, नीरज क्षीरसागर आणि हेमंत कानसकर

रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय यांचा वाढदिवस २३ फेब्रुवारी या दिवशी साजरा झाला. यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांना त्यांच्या रायपूर येथील निवासस्थानी शुभेच्छा देण्यात आल्या आणि सनातननिर्मित प्रभु श्रीरामाचे सात्त्विक चित्र असलेली प्रतिमा भेट देण्यात आली. या वेळी समितीचे सर्वश्री नीरज क्षीरसागर, हेमंत कानसकर, सौरभ चॅटर्जी, कमाल बिस्वाल आदी उपस्थित होते.