आदिवासींच्या भूमीवर अतिक्रमण केल्याच्या विरोधात उपोषणाला बसलेल्यांना अटक केल्याचा अपसमज

हामरेन (आसाम) – आसाममधील वेस्ट कार्बी आंगलाँग जिल्ह्यात भूमीच्या जुन्या वादाला हिंसक वळण लागले. यामुळे आंदोलकांनी भाजपचे स्थानिक नेते आणि ‘कार्बी आंगलाँग स्वायत्त परिषदे’चे मुख्य कार्यकारी सदस्य तुलिराम रोंगहांग यांच्या घराला आग लावली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी बळाचा वापर केला. यात किमान ३ जण घायाळ झाले.
१. गेले १५ दिवस पेलांगपी परिसरात ९ जण आरक्षित भूमींवरील अतिक्रमण हटवण्यासाठी उपोषणाला बसले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने पोलिसांनी त्यांना रुग्णालयात हलवले. या वेळी त्यांना अटक करण्यात आल्याचा अन्य आंदोलक आदिवासींचा अपसमज झाला. त्यावरून संतापाचा उद्रेक झाला.
२. कार्बी आंगलाँग हा आदिवासीबहुल जिल्हा असून तो राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीच्या कक्षेत येतो. येथील मोठे क्षेत्र केवळ कुरणासाठी आरक्षित आहे. या भूमीवर बिगरआदिवासी लोकांनी अतिक्रमण केल्याचा आरोप करत स्थानिक संघटना अनेक दिवसांपासून त्यांच्या हकालपट्टीची मागणी करत आहेत. त्यासाठीच हे आमरण उपोषण चालू होते.
३. मुळात हे प्रकरण न्यायालयात असल्याने सरकार किंवा ‘कार्बी आंगलाँग स्वायत्त परिषद’ थेट कारवाई करू शकत नाही, असे रोंगहांग यांनी स्पष्ट केले आहे.
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिरातील दान चोरीनंतर मंदिराचे सरकारीकरण होण्याची शक्यता
बिदर (कर्नाटक) : महाहिंदु मेळाव्याला अनुमती मिळताच समाजकंटकांकडून श्रीरामाचा अवमान !
तुमच्याकडे वर्दी आहे; म्हणजे तुम्ही काहीही करू शकता का ? – Karnataka High Court
इस्लाम स्वीकारल्यास आपोआप ‘मागासवर्गीय मुसलमान’ दर्जा मिळू शकत नाही ! : Madras High Court
कोलकाता : ‘इस्कॉन’ने शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनातून अंडे हटवल्याने वाद !
Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !