पहिल्याच दिवशी अर्थसंकल्प मांडण्यास विरोधी आमदारांची हरकत

पणजी, २५ फेब्रुवारी (वार्ता.) – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ६ मार्चला वर्ष २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडणार आहेत. शुक्रवारी पहिल्याच दिवशी खासगी दिवस असल्याने विरोधी आमदारांनी ६ मार्च या दिवशी अर्थसंकल्प मांडण्यास हरकत घेतली आहे; मात्र मुहूर्त चांगला असल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ६ मार्च या दिवशी अर्थसंकल्प मांडण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेत २५ फेब्रुवारी या दिवशी कामकाज सल्लागार समितीची सभापती गणेश गावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यात आले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी २ सहस्र ३९५ प्रश्न आले ! – सभापती गणेश गावकर
विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीविषयी अधिक माहिती देतांना सभापती गणेश गावकर म्हणाले, ‘‘विधानसभेत अर्थसंकल्पावर ९ आणि १० मार्च या दिवशी चर्चा होणार आहे आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी २७ मार्चला विनियोग विधेयक सादर केले जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सदस्यांकडून २ सहस्र ३९५ प्रश्न आले आहेत. यामध्ये ५६३ तारांकित, तर १ सहस्र ८३२ अतारांकित प्रश्नांचा समावेश आहे. अधिवेशनात १५ खासगी ठरावांवर चर्चा होणार आहे.’’ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार विजय सरदेसाई आणि इतर सदस्य उपस्थित होते.
स्थापनेनंतर १० वर्षांनी ‘महाआयटी’ने विधीमंडळात सादर केला पहिला वार्षिक अहवाल !
ठाणे येथे शाळेत प्रवेश देण्यासाठी लाच घेणार्या २ खासगी व्यक्ती कह्यात !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावे ७० कोटी रुपयांचे बनावट कार्यआदेश; गुन्हे नोंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
राज्यातील जनगणना पहिल्या टप्प्यातील माहिती संकलन १०० टक्के डिजिटल पद्धतीने पूर्ण ! – मुख्यमंत्री
महाराष्ट्रात अणूऊर्जा प्रकल्पासाठी सामंजस्य करार; मात्र अद्याप जागेची निश्चिती नाही !