८ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘स्वतःच्या वा पालकांच्या नकळत होणारे मुलांचे धर्मांतर, देवतांचे विडंबन वेळीच न थांबवल्याने झालेली आजची स्थिती अन् कथित नास्तिक, पुरोगामी आणि विद्रोही यांच्याकडून देवता, तसेच संत यांच्याविषयी हिंदूंच्या मनातील श्रद्धेवर घाला’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/1005695.html

४. अश्लीलतेला प्रोत्साहन आणि सामाजिक नैतिकतेचा र्हास
अ. शाळेत चित्रपटाच्या गाण्यावर हिडीस नृत्य : मध्यंतरी शिक्षकदिनाच्या दिवशी चित्रपटाच्या गाण्यावर नृत्य करण्याची स्पर्धा एका शाळेने आयोजित केली होती. तेव्हा एका लहान मुलीने चित्रपटाच्या एका गाण्यावर अगदी हिडीस नृत्य सादर केले होते. हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर बराच प्रसारित झाला होता. या माध्यमातून आपण लहान मुलांवर काय संस्कार करत आहोत ? याचे भान पालक आणि शिक्षक दोघांनाही नसावे का ?

आ. तमाशा : काही वर्षांपूर्वी गावांमध्ये जत्रा असल्यास येथे तमाशा सादर करणारी काही मंडळी येत असत. त्या तमाशात काही बायका रात्री सर्वांसमोर नृत्य सादर करायच्या आणि लोक त्यांना पैसे द्यायचे, असे हे कलेचे सादरीकरण त्या वेळी रात्री उशिरापर्यंत चालू असायचे; परंतु तेव्हा वडीलधारी मंडळी मुलांना त्या वाटेने कधी जाऊ देत नसत; कारण त्यांना भविष्यात याचा किती धोका आहे, त्याची कल्पना होती. कालांतराने जत्रेतील हे सादरीकरण न्यून होत गेले.
इ. ‘ऑनलाईन’ संकेतस्थळांच्या माध्यमातून अश्लीलता : आज ओटीटी प्लॅटफॉर्म, यू ट्यूब वाहिनी आणि अनेक संकेतस्थळे यांवर अश्लील नृत्ये, ध्वनीचित्रफिती अन् बीभत्स दृश्ये पहाण्यासाठी सर्रास उपलब्ध असतात. या प्रकारांना वेळीच पायबंद न घातल्याने आज मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढून मुलींची सामाजिक सुरक्षितता किती धोक्यात आली आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
आजही नैतिक मूल्यांची हानी करणार्या अशा काही गोष्टी समाजात सतत होतांना दिसतात आणि समाजधुरीण त्याकडे व्यक्तीस्वातंत्र्य, कला, वैयक्तिक मत इत्यादी अंगाने पाहून त्याकडे दुर्लक्ष करतात; परंतु आज जर त्यांना आळा घातला नाही, तर उद्या त्यांचे किती भीषण परिणाम होतील, याची कल्पना करवत नाही.
ई. मुक्त लैंगिक शिक्षण : साधारण २ दशकांपूर्वी स्त्री-पुरुष संबंधांविषयी चारचौघांमध्ये चर्चा करणे निषिद्ध मानले जात होते. तशी चर्चा कुणी करतही नव्हते. जे काय असायचे, ते चार भिंतींच्या आत. मधल्या काळात ‘एड्स’ रोगाचा फैलाव झाल्याने सांस्कृतिक मंत्रालयाने मुलांना मुक्त लैंगिक शिक्षण देण्याचे आणि युवकांशी मोकळेपणाने संवाद साधण्याचे सूत्र समोर आणले होते. त्या वेळी विश्व हिंदु परिषदेचे आचार्य धर्मेंद्र यांनी त्याला कडाडून विरोध केला होता. त्या वेळी ते म्हणाले होते, ‘‘हा मूर्खपणा आहे. मुळात प्रत्येक प्राण्याला जन्मतः हे शिक्षण देऊनच भगवंताने पाठवलेले असते. त्याची वेगळी आवश्यकता नाही; कारण भिंतींवर खेळणार्या पालीसुद्धा प्रजोत्पादन करत असतात. त्यांना हे असले शिक्षण कोण देते ?’’ ‘या शिक्षणाचे लाभ किती आणि दुष्परिणाम किती होतील, याचे चिंतन सरकारने करावे’, असे आवाहन त्यांनी केले होते.
अर्थात् त्या वेळी सरकारकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. आज या मुक्त शिक्षणपद्धतीचा दुष्परिणाम, म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ! आज युवक आणि युवती सर्रासपणे विवाह न करता एकत्र रहातात. त्यामुळे कुटुंबव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. यामुळे संबंधित युवतींचे जीवनसुद्धा असुरक्षित झाले आहे. त्यामुळे मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने याविषयी भाष्य करतांना ‘महिलांना खरी सुरक्षितता पत्नीचा दर्जा मिळाल्यानंतरच लाभते’, असे म्हटले आहे.
वेळ निघून जाण्यापूर्वी…

♦ दक्षता : छोट्या वाटणार्या अयोग्य घटनांकडे (उदा. सार्वजनिक ठिकाणी नमाज, हिडीस नृत्ये) दुर्लक्ष करणे, ही भविष्यातील मोठ्या संकटाची नांदी आहे.
आज जर आपण या अपप्रकारांना आळा घातला नाही, तर उद्याचा काळ आपल्याला कधीच क्षमा करणार नाही !
♦ नैतिकता : पाश्चात्त्य अंधानुकरण आणि ‘लिव्ह-इन’सारख्या प्रथांमुळे आपली कुटुंबव्यवस्था कोलमडत आहे, ती वाचवणे, ही काळाची आवश्यकता आहे.
लैंगिक शिक्षणाच्या नावाखाली स्वैराचाराला प्रोत्साहन दिल्याने स्त्रियांच्या असुरक्षिततेसह नैतिक सामाजिक स्वास्थ्य हरवले आहे.
♦ सांस्कृतिक रक्षण : केवळ ‘धर्म मोठा आहे’, असे म्हणून स्वस्थ बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती आणि विरोधाची आवश्यकता आहे.
यामुळेच म्हणावेसे वाटते, ‘अपप्रकारांना वेळीच विरोध करायला हवा. अयोग्य गोष्टींचा प्रतिवाद करायलाच हवा.’ असे केले नाही, तर उद्या काळ आपल्याला क्षमा करणार नाही.
५. वाढती जिहादी आक्रमणे
अ. भूमी जिहाद : काही वर्षांपूर्वी गावाच्या बाहेर, कुठेतरी एखाद्या दगडाला चुना फासून त्यावर हिरवे कापड पांघरलेले दिसायचे. त्या वेळी ‘कुणाचे काहीतरी काम चालले असेल’, या विचाराने त्याकडे दुर्लक्ष केले जायचे; परंतु आज जेव्हा सरकारी जागा, बसस्थानके, रेल्वेस्थानके, इतकेच नव्हे, तर जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय येथे जेव्हा प्रार्थनास्थळे उभारलेले दिसते, तेव्हा हे किती नियोजनबद्ध अतिक्रमण होते, हे लक्षात येते. आजही प्रवासात घाट वळणावर काही ठिकाणी दगडांना अशा प्रकारे रंग दिलेला दिसतो. गड-दुर्गांवरही असे काही बांधकाम दिसते, तेव्हाही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात; परंतु भूमी जिहादचे भविष्यकालीन परिणाम हिंदूंसाठी किती भयावह असणार, हे निराळे सांगण्याची आवश्यकता नाही.
आ. लव्ह जिहाद : पूर्वी लोक समाजाची भीड बाळगून रोटी-बेटी व्यवहार करतांना त्यातल्या त्यात स्वजातीतील कुटुंबातच मुलींचा विवाह लावून देत असत. कालांतराने सुधारमतवादाच्या नावाखाली जातीसंकर आणि वर्णसंकर चालू झाला. त्यानंतर आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह यांनाही प्रोत्साहन मिळू लागले. घरात काही दुरुस्ती करायला या लोकांना बोलावतात आणि नंतर त्यामुळे हिंदूंच्या मुली कशा पळवल्या जातात, हेही आता सर्वश्रुत झाले आहे. आज ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना पाहून काही लोकांना थोडी जाग आली. या गोष्टींना वेळीच थांबवले असते, तर कदाचित आज चित्र वेगळे असते. आता तर परिस्थिती अशी आहे की, हिंदूंना स्वतःच्या लाडक्या मुलीच्या मृतदेहाचे तुकडे शीतकपाटामध्ये (फ्रीजमध्ये) पहावे लागत आहेत. ‘उद्या या नरभक्षी लोकांनी हेच तुकडे शिजवून खाल्ले’, अशा बातम्या ऐकायला मिळाल्या, तर नवल वाटायला नको.
इ. नमाजपठणाच्या माध्यमातून जिहाद : आरंभी उद्याने, मोकळे रस्ते, रेल्वेस्थानकांचे फलाट अशी जागा मिळेल, तेथे धर्मांधांनी नमाजपठण करायला प्रारंभ केला, तेव्हा ‘त्याने काय फरक पडणार आहे’, असा विचार करून हिंदूंनी प्रथम त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम असा झाला की, जणू ‘स्वतःच्या हक्काची जागा आहे’, असे समजून आणि प्रसंगी त्यासाठी झगडून हे लोक नमाजपठण करत आहेत. मंत्रालय, विमानतळ येथेही यांना नमाजपठणासाठी जागा उपलब्ध करून द्यावी लागत आहे. त्यासह या लोकांनी हिंदूंची कित्येक देवस्थाने अतिक्रमण करून काबीज केली आहेत. हिंदू या लोकांना काम देतांना विचार करत नाहीत.

६. अशा आघातांकडे पहाण्याचा निद्रिस्त हिंदूंचा अयोग्य दृष्टीकोन !
मी साधारण इयत्ता ६ वीपासून पदवीधर होईपर्यंत एका संघटनेशी निगडित होतो. त्या वेळी ‘असे काही अयोग्य घडत असतांना आपण त्यांचा विरोध का करत नाही ?’, असा प्रश्न मी संघटनेच्या तत्कालीन प्रमुखांना विचारला होता. त्या वेळी ते मला म्हणाले होते, ‘‘आपला हिंदु धर्म इतका मोठा आहे की, तो अशा छोट्या छोट्या गोष्टींनी नष्ट होणारा नाही. त्यामुळे आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे; कारण अशा घटनांना विरोध केल्याने त्यांना निष्कारण महत्त्व मिळते. यापेक्षा आपण आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व लक्षात घ्यावे.’’
हे म्हणणे किती चुकीचे होते, हे आज लक्षात येते; कारण त्याच वेळी या गोष्टींना आळा घालण्यासाठी काही प्रयत्न केले असते, तर कदाचित आज स्थिती वेगळी असती. तसे त्या वेळी न झाल्याने आज या गोष्टीची नोंद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, हिंदु जनजागृती समिती आणि तत्सम प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना घ्यावी लागत आहे; परंतु तोपर्यंत ‘काळ मात्र सोकावला आहे’, हे मात्र निश्चित !’
(समाप्त)
– श्री. योगेश जलतारे, संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूह.
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !