Arvi Dog Bite : आर्वी (जिल्हा वर्धा) येथे रेबीजग्रस्त कुत्रा चावल्याने १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

१८ जणांचा घेतला चावा

प्रतिकात्मक छायाचित्र

वर्धा – येथील आर्वी शहरात एका रेबीजग्रस्त कुत्र्याने ६ लहान मुलांसह १८ जणांना चावा घेतला. घायाळ झालेल्या सर्वांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत; पण त्यांच्यापैकी गंभीर घायाळ झालेला धवल गुल्हाने (वय १३ वर्षे) याचा उपचारांच्या वेळी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोकाट कुत्र्यांवर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांनी करण्यात येत आहे. (अशी मागणी करावी का लागते ? प्रशासन स्वतःहून हे नियंत्रण का आणत नाही ? – संपादक)

संपादकीय भूमिका

मोकाट रेबिजग्रस्त कुत्र्यांचा बंदोबस्त न करणारे आणि त्यामुळे लोकांना मरू देणार्‍या प्रशासनातील संबंधितांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा !