
नवी मुंबई – प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या चरण पादुकांचे खारघर येथे १६ फेब्रुवारी या दिवशी आगमन झाले. इंदूर (मध्यप्रदेश) येथून मोरचुंडी (जिल्हा पालघर) येथे या पादुका आणण्यात आल्या होत्या. खारघर येथील भक्त श्री. सतीश राऊत यांच्या घरी मंगलमय वातावरणात पादुकांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांचे भावपूर्ण पूजन झाले. येथे उपस्थित भक्तांनी म्हटलेल्या भजनांच्या कार्यक्रमाच्या वेळी प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या अस्तित्वाची अनुभूती अनेकांनी घेतली. त्यानंतर भंडार्याचा कार्यक्रम पार पडला.

या वेळी डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले आणि घाटकोपर येथील प.पू. पराशर जोशीबाबा यांची या वेळी वंदनीय उपस्थिती होती. प.पू. भक्तराज महाराजांच्या अनेक भक्तांनी या वेळी पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतला.
प.पू. भक्तराज महाराज असतांना प्रतिवर्षी ते महाशिवरात्रीला मोरचुंडी येथे यागासाठी येत असत. त्यांच्या निर्वाणानंतर त्यांच्या भक्तांनी प्रतिवर्षी त्यांच्या चरण पादुका महाशिवरात्रीला मोरचुंडी येथे आणण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !