रत्नागिरीत मधुभाई – साहित्य, समाज कृतज्ञता सोहळा !

रत्नागिरी – मराठी साहित्यिकांनी लिहिलेले साहित्य अन्य भाषांमध्ये प्रकाशित व्हावे, हा संकल्प स्व. यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असतांना केला होता; पण त्याची कार्यवाही का झाली नाही, हे ठाऊक नाही. त्याची कार्यवाही अनुवाद अकादमीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय विश्व मराठी साहित्य संमेलनात घेत आहोत. ज्या लेखकाला त्याचे साहित्य मराठीतून हिंदीत करायचे असेल, मराठीतून कन्नडमध्ये करायचे असेल, मराठीतून तमीळमध्ये करायचे असेल, तर त्यालासुद्धा निधी द्यायचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतलेला आहे. परदेशातील मराठी मुलांना ‘ऑनलाईन’ मराठी भाषेचे शिक्षण देण्याचा उपक्रम पुढच्या वर्षापासून चालू केला जाईल, अशी ग्वाही उद्योग आणि मराठी भाषा तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मधुभाई – साहित्य, समाज कृतज्ञता सोहळा’ निमित्ताने पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आणि प्रकट मुलाखत कार्यक्रम १४ फेब्रुवारीला येथील स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृहात झाला.
डॉ. उदय सामंत पुढे म्हणाले की,
१. मराठी भाषा विभागाला वित्तमंत्री अजितदादांनी २६५ कोटी रुपये दिले. त्यामधून सगळे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये चालू झालेले आहेत. बाल साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन, युवा साहित्य संमेलन, देहलीचे आमचे मराठी साहित्य संमेलन असेल, सातार्याचे मराठी साहित्य संमेलन असेल. आज मराठी भाषेचे दालन महाराष्ट्राच्या कुठल्याही काना-कोपर्यामध्ये उभारण्याची ताकद मराठी भाषा विभागाची झालेली आहे.
२. काश्मीरलासुद्धा मराठी पुस्तकांचे गाव करण्याचा निर्णय माझ्या मराठी भाषा विभागाने घेतला आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ‘जे.एन्.यू.’ मध्ये कधी घटना घडली नव्हती, आज मात्र तेथे कुसुमाग्रजांच्या नावाचे मराठीचे अध्यासन केंद्र आहे. तिथे गनिमी काव्यावर एम्.ए. चा अभ्यासक्रम सिद्ध केला आहे.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !