३ दिवस अतीमहनीय दर्शन बंद !

नाशिक – १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वराचे मंदिर येत्या रविवारी महाशिवरात्री उत्सवानिमित्त दर्शनासाठी सलग ४१ घंटे उघडे रहाणार आहे, तसेच १४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत सर्व प्रकारचे अतीमहनीय (व्हीआयपी) दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय त्र्यंबकेश्वर देवस्थान न्यासाने घेतला आहे.
१५ फेब्रुवारीपासून पहाटे ४ वाजल्यापासून १६ फेब्रुवारीच्या रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. मुख्य दर्शन रांग पूर्व दरवाजा दर्शनबारी येथून महाशिवरात्रीच्या दिवशी २४ घंटे चालू राहील. महाशिवरात्रीच्या दिवशी देणगी दर्शन पूर्णपणे बंद असणार आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भाविकांना गर्भगृहात जाऊन दर्शन घेण्यास मनाई करण्यात आली आहे.
१५ फेब्रुवारीच्या रात्री ११ वाजता मंदिर प्रांगणात त्र्यंबक राजाची पालखी मिरवणूक निघेल, तसेच याच दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर मंदिरात महापूजा, आरती अभिषेक, असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. १६ फेब्रुवारीच्या दुपारी ३ वाजता मंदिरातून कुशावर्त तीर्थापर्यंत मुख्य रस्त्याने शहरातून पालखी मिरवणूक निघेल. कुशावर्त तीर्थावर पूजा आणि आरती होऊन पालखी परत मंदिरात येईल.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !