मंडळाच्या २८ आस्थापनांना नोटिसा

पणजी, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – समुद्रकिनारपट्टीतील रहिवासी रात्रीच्या वेळी ध्वनीप्रदूषण होत असल्याच्या तक्रारी गेली अनेक वर्षे करत आहेत. या पार्श्वभूमीवर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने ध्वनीप्रदूषणासंबंधी देखरेख यंत्रणा अधिक सक्षम केल्याचा दावा केला आहे. मंडळाने ध्वनीप्रदूषणासंबंधी देखरेख यंत्रणा एकूण ३८ ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात नव्याने कार्यरत केल्या आहेत. या व्यतिरिक्त मंडळाची पाळोळे, केळशी, कोलवा, बाणावली, कळंगुट, कांदोळी, वागातोर, हणजूण आणि हरमल या समुद्रकिनारपट्टीवर ‘ऑनलाईन’ यंत्रणा यापूर्वीच कार्यरत आहेत. ही यंत्रणा डिसेंबर २०२५ पासून दिवसभरातील २४ घंटे कार्यरत असते. मंडळातील कर्मचारी आता ध्वनीप्रदूषणावर देखरेख ठेवण्यासाठी ३ पाळ्यांमध्ये (‘शिफ्ट’मध्ये) काम करत आहेत. ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात गतवर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने दिलेल्या आदेशानंतर मंडळ ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कठोरतेने कारवाई करू लागले आहे.
मंडळाने ही यंत्रणा सक्षमपणे कार्यरत केल्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये एकूण २८ आस्थापनांना ध्वनीप्रदूषणासंबंधी नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. नागरिकांना तक्रार करता यावी, यासाठी मंडळाने ‘८९५६४८७९३८’ हा ‘हेल्पलाईन’ भ्रमणभाष क्रमांकही प्रसिद्ध केला आहे. मंडळाच्या मते त्यांना एखाद्या ठिकाणी ध्वनीप्रदूषणाविषयी तक्रार आल्यावर मंडळ यासंबंधी संबंधित पोलीस ठाण्याला कळवते. मंडळाने नुकतीच ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कारवाई करतांना २ नाईटक्लब्सवर कारवाई केली आहे.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !