
म्हापसा, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – लग्न समारंभातील संगीत प्रशासन रात्री १० वाजल्यानंतर कठारेतेने बंद करते; मात्र हणजूण-वागातोर समुद्रकिनारपट्टीतील नाईट क्लबमधील ध्वनीप्रदूषण रात्रभर चालूच असते. गत आठवड्याच्या शेवटी शनिवारी आणि रविवारी असा अनुभव हणजूण-वागातोर समुद्रकिनारपट्टीजवळील रहिवाशांना आला आहे.
हणजूण येथील ‘जंगल ओरिजीन’, ‘मसाया’ आणि ‘आवरा बीच कॅफे’ या ठिकाणी २ रात्री रात्रभर पार्ट्या चालू होत्या आणि यामध्ये शेकडो लोकांनी सहभाग घेतला होता. या वेळी झालेल्या ध्वनीप्रदूषणाचा आसपासच्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे या ठिकाणी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी गस्त घालण्यासाठी रात्री ९ वाजता भेट दिली आणि भेटीच्या वेळी पार्ट्यांमधील ध्वनी अल्प झाला. अधिकारी तेथून गेल्यानंतर पुन्हा ध्वनीप्रदूषण पूर्वीप्रमाणेच चालू राहिले. विशेष म्हणजे ‘जंगल ओरिजीन’ येथे अनधिकृतपणे पार्टीचे आयोजन केले जात असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी यापूर्वी केल्या होत्या; मात्र तरीही मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक लावून पार्टी करण्यात आली. या पार्टीविषयी सामाजिक माध्यमातून उघडपणे प्रसिद्धी करण्यात येत असूनही त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !