फरीदाबाद (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने बालक-पालक परिचय मेळाव्याचे आयोजन

फरीदाबाद (हरियाणा) – सनातन संस्थेच्या वतीने येथील सेक्टर २९ मधील श्री सनातन धर्म मंदिरात ‘बालक-पालक परिचय’ समारंभ २५ जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आला होता. या वेळी मुलांनी उत्साहाने सनातनच्या बालसंस्कार वर्गात शिकवलेल्या बोधप्रद कथा, आध्यात्मिक खेळ आणि भावार्थासह श्लोक सादर केले. या कार्यक्रमाचा लाभ अनेक पालक आणि मुले यांनी घेतला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन केले. सनातन संस्थेच्या बालसंस्कार वर्गात मिळत असलेले उत्कृष्ट संस्कार पाहून पालकांनी आनंद व्यक्त केला.

सनातन संस्थेच्या साधिका सीमा शर्मा यांनी ‘सनातन संस्थेचा कार्य परिचय आणि सध्याच्या काळात असलेली बालसंस्कार वर्गाची आवश्यकता’ यांविषयी सांगितले. सौ. तृप्ती जोशी यांनी ‘मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवण्यात पालकांची भूमिका’ याविषयी मार्गदर्शन केले. सौ. सरोज गुप्ता यांनी फरीदाबाद जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार्या ‘ऑनलाईन’ बालसंस्कार वर्गाचे अद्वितीय प्रयत्न आणि मुलांमध्ये दिसून आलेले पालट यांविषयी माहिती सांगितली. बालसंस्कार वर्गात सहभागी झाल्यानंतर मुलांमध्ये झालेल्या परिवर्तनाविषयी त्यांच्या पालकांनी अनुभवकथन केले, तसेच त्यांनी संस्थेच्या निःस्वार्थ कार्याचे कौतुक केले.
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन![]() ‘आजच्या काळात तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आध्यात्मिक साधना आवश्यक आहे. जर पालकांनी आध्यात्मिक साधना केली, तर मुलेही त्याचे अनुकरण करतील आणि सुसंस्कृत होतील’, असे मार्गदर्शन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘ऑनलाईन’ उपस्थित राहून मुले आणि पालक यांना केले. |
क्षणचित्रे
१. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एका जिज्ञासूंना बालक-पालक सोहळा अतिशय आवडला. त्यांनी सांगितले, ‘सनातन संस्थेचा हा सोहळा एक असे व्यासपीठ आहे, जेथे मुले सुसंस्कृत होत आहेत. त्यांनी त्यांच्या सोसायटीमध्ये बालसंस्कार वर्ग घेण्याची मागणी केली.
२. काही पालकांनी लघुचित्रफितीच्या माध्यमातून उपस्थितांना संदेश दिला की, सर्व पालकांनी त्यांच्या मुलांना या उपक्रमात वैयक्तिकरित्या आणि ‘ऑनलाईन’ दोन्ही प्रकारे सहभागी करून घ्यावे.

देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !