
मुंबई – विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे. शहरीकरणाला नियोजनबद्ध करून, उद्योग आणि उद्योजकता यांना प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक अन् रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात १२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, शेती, पशूपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यांसाठी भरीव प्रावधाने करण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणार्या मुलींसाठी वसतीगृहांची योजना सिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात ‘आपात चिकित्सा व्यवस्था’ उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल. या अर्थसंकल्पामुळे उद्योग क्षेत्रात रोजगार निर्मिती ध्येय दिसत आहे. त्यातून गुंतवणुकीला चालना मिळणार आहे.
पायाभूत सुविधेसाठी सरकार १२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. शेती, पशूपालन, मत्स्य व्यवसाय, सिंचनासाठी भरीव योजना, गुंतवणूक आणि वाढ होण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वपूर्ण आहे. ‘लखपती दीदी’ योजना, ‘मार्केटप्लेस’ निर्माण करण्याची योजना, ‘वुमन लिड’ व्यवस्था (स्त्रियांना नेतृत्व करता येणारी व्यवस्था) निर्माण झाल्याने महिलांचा सहभाग वाढेल. काही ‘कॉरिडॉर’ (सुसज्ज मार्ग) घोषित करण्यात आल्याने महाराष्ट्राला लाभ होईल. ग्रामीण रस्ते प्रकल्पात ३७८ कोटी रुपये, उपसा सिंचन २०७ कोटी रुपये, असे वेगवेगळे प्रकल्प यांत नमूद आहेत. याचा निश्चितच राज्याला लाभ होणार आहे.
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू
Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश
Allahabad HC : बुलडोझर कारवाईसंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपिठातील न्यायाधिशांचा परस्परविरोधी निकाल !