
रामनाथी (गोवा) – प.पू. सद्गुरु अनंतानंद साईश यांचा ७१ वा प्रकटोत्सव ८ आणि ९ फेब्रुवारी २०२६ या दिवशी भक्तवात्सल्याश्रम, अन्नपूर्णा रोड, इंदूर येथे साजरा होणार आहे. यानिमित्त रविवार, ८ फेब्रुवारी या दिवशी सकाळी स्तवन मंजिरी आणि श्री रामानंद बावनी पाठ, सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत ‘एक आध्यात्मिक संगीतमय वाटचाल’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत प.पू. श्री नाना महाराज तराणेकर भजनी मंडळ (श्री. संजय तराणेकर) विभिन्न संतांनी रचलेल्या गवळणी आणि भारुड प्रस्तुत करणार आहेत. त्यानंतर रात्री ८.३० वाजता आरती आणि महाप्रसाद असेल. सोमवार, ९ फेब्रुवारीला सकाळी ९ ते १० श्री सत्यनारायण पूजन, सकाळी १० ते दुपारी १२ श्रींच्या पादुकांवर लघुरुद्राभिषेक, दुपारी १२.३० वाजता छप्पन भोग आणि महाप्रसाद होणार आहे. ४ ते सायंकाळी ५.३० या वेळेत भक्तराज महिला मंडळ, इंदूर यांचे भजन, सायंकाळी ७.३० वाजता पारंपरिक भजन, रात्री १० वाजता आरती आणि महाप्रसाद होणार आहे. छप्पन भोग अर्पण करण्यासाठी इच्छुकांनी त्यांची नावे सौ. मयुरी अभ्यंकर (९९२६२८११२७ ) आणि सौ. माधवी बक्षी (९४०७५४५८८४ ) यांना ६ फेब्रुवारीपर्यंत पाठवण्याविषयी सूचित करण्यात आले आहे.
प.पू. रामानंद महाराज निर्वाण उत्सव गुरुवार, २६ फेब्रुवारी २०२६ या दिवशी श्री भक्तवात्सल्याश्रम, इंदूर येथे साजरा होणार आहे. ‘श्रींच्या प्रकटोत्सवात आपण आप्त आणि इष्टमित्रांसहित सहभागी होऊन आपला आनंद वृद्धींगत करावा’, अशी विनंती ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. शरद रामकृष्ण बापट यांनी केली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक