भगवंताच्या दर्शनासाठी भावपूर्णपणे हात जोडून मंदिर परिसरात चालत असल्याचा व्हिडिओ प्रसारित

तिरुपती (आंध्रप्रदेश) – इंडोनेशियाचे मुसलमान असलेले माजी राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी २९ जानेवारीला येथील श्रीव्यंकटेश्वर स्वामी मंदिरात श्रीव्यंकटेशाचे दर्शन घेतले. या वेळी त्यांना पूजाअर्चा करण्याचाही सन्मान प्राप्त झाला, अशी माहिती तिरुमला-तिरुपती देवस्थानाच्या एका अधिकार्याने दिली. विडोडो हे भगवंताच्या दर्शनासाठी भावपूर्णपणे हात जोडून मंदिर परिसरात चालत असल्याचा व्हिडिओही प्रसारित झाला आहे.
Former Indonesian President Joko Widodo visited the Sri Venkateswara Swamy Temple in Tirupati for a divine Darshan. 🛕✨
While this reflects the inclusivity of Hinduism, where a former President of the world’s largest Islamic nation can visit a Hindu temple, it wouldn’t be… pic.twitter.com/vqT6moJwRa
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 31, 2026
दर्शनानंतर विडोडो यांना रंगनायकुला मंडपम् येथे रेशमी वस्त्रे, प्रभूंचा प्रसाद आणि श्रीव्यंकटेशाचे छायाचित्र प्रसादस्वरूपात देण्यात आले. जगातील सर्वांत मोठ्या इस्लामी देशाच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी मंदिराला भेट दिल्याने या घटनेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. विडोडो हे वर्ष २०१४ ते २०२४ अशी १० वर्षे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष होते.
संपादकीय भूमिकाजगातील सर्वांत मोठ्या इस्लामी देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष हिंदूंच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकतात, यातून हिंदु धर्माची तर सर्वसमावेशकता लक्षात येतेच; परंतु आता या घटनेवरून कुणा मुल्ला-मौलवीने त्यांच्या विरोधात फतवा काढला, तर आश्चर्य वाटू नये ! |
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin