नियम लावल्यास ‘वन्दे मातरम्’ गायनाच्या वेळी उभे रहाणे अनिवार्य होणार !
नवी देहली : ‘वन्दे मातरम्’च्या रचनेला १५० वर्षे पूर्ण झाली. यामुळे जे नियम ‘जन गण मन’ या राष्ट्रगीतासाठी लागू होतात, तेच नियम ‘वन्दे मातरम्’वरही लागू केले जावेत का ? याचा विचार केंद्रीय गृहमंत्रालय करत आहे.
राज्यघटनेच्या कलम ५१(ए)मध्ये नागरिकांना राष्ट्रगीताचा आदर करण्याचे दायित्व निश्चित केले आहे. तथापि ‘वन्दे मातरम्’साठी लोकांना उभे रहाणे किंवा त्याच्या गायनात भाग घेणे अनिवार्य करणारी कोणतीही कायदेशीर व्यवस्था सध्या अस्तित्वात नाही.
सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालये यांमध्ये याचिका प्रविष्ट करून ‘वन्दे मातरम्’लाही राष्ट्रगीताचे नियम लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. तथापि सरकारने ‘हे नियम केवळ ‘जन गण मन’ला लागू होतात, ‘वन्दे मातरम्’ला नाही’, असे स्पष्ट केले आहे.

थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !