
मॉस्को (रशिया) – ग्रीनलँडचे सूत्र अमेरिका आणि तिचे ‘नाटो’मधील (२९ देशांच्या सैनिकी संघटनेमधील) मित्रराष्ट्र आपापसांत सोडवतील. ग्रीनलँडचे काय होते, याच्याशी आमचे काहीही देणेघेणे नाही, असे विधान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केले आहे. तसेच पुतिन यांनी ग्रीनलँडमधील रहिवाशांबद्दल सहानुभूतीही व्यक्त केली आहे. ट्रम्प ग्रीनलँडला नियंत्रणात घेण्याच्या प्रयत्नात असल्यावरून पुतिन यांनी रशियाची भूमिका स्पष्ट केली.
Russia has nothing to do with what happens to Greenland – Putin
"Denmark has always treated Greenland like its own colony !"
Read more: https://t.co/DqCAbEt9gh pic.twitter.com/CcIJJNfDPW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 24, 2026
डेन्मार्कने ग्रीनलँडला नेहमीच स्वतःच्या वसाहतीप्रमाणे वागवले !
पुतिन म्हणाले की, तसे पहाता, डेन्मार्कने ग्रीनलँडला नेहमीच स्वतःच्या वसाहतीप्रमाणे वागवले आहे आणि त्यासंदर्भातची वागणूक क्रूर नसली तरी बर्यापैकी कठोर राहिली आहे; पण ते पूर्णपणे वेगळे सूत्र आहे आणि सध्या त्यामध्ये कुणाला रस असेल, असे मला वाटत नाही. त्याची आम्हाला नक्कीच चिंता वाटत नाही. मला वाटते की, ते आपापसांत हा प्रश्न सोडवतील.
पुतिन यांनी या वेळी डेन्मार्कने वर्ष १९१७ मध्ये ‘व्हर्जिन आयलंड्स’ अमेरिकेला विकल्याची, तसेच वर्ष १८६७ मध्ये रशियाने अमेरिकेला अलास्का विकल्याची आठवणही पुतिन यांनी करून दिली.
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
Mohammad Nawaz Baned : पाकिस्तानचा क्रिकेटपटू महंमद नवाज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ३ मासांची बंदी
अमेरिकेसमवेत झालेल्या करारातून इराणची माघार !
US Indians Deportation : अमेरिका १८ सहस्र भारतीय नागरिकांना देशाबाहेर काढणार !
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट