
कोल्हापूर – कणेरी मठाचे प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांची हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी ३ नोव्हेंबरला भेट घेतली. या वेळी त्यांनी समितीच्या वतीने चालू असणारे ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियान, तसेच अन्य मोहिमांची माहिती दिली. पुणे जिल्ह्यातील ओझर श्री गणेश मंदिर येथे २ आणि ३ डिसेंबर या दिवशी मंदिर महासंघ परिषद आयोजित करण्यात असून या परिषदेसाठीही स्वामीजींना निमंत्रण देण्यात आले. या प्रसंगी स्वामीजींनी सर्व विषय ऐकून ‘हिंदु धर्मजागृतीच्या कार्यास माझे नेहमीच आशीर्वाद आहेत’, असे सांगितले.
या प्रसंगी स्वामीजींना ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’, ‘हलाल जिहाद’, तसेच ‘दाभोलकर-पानसरे हत्या : तपासातील रहस्ये ?’, हे ग्रंथ भेट देण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, उद्योजक श्री. आनंद पाटील उपस्थित होते.
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला
जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्वराला जलाभिषेक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
‘जीवोत्तम विद्यापीठम्’ सनातन धर्माच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी
स्मार्ट मीटरच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांचे आंदोलन