नवी देहली येथे सनातनच्या साधकांनी मंदिर स्वच्छता करून हिंदु राष्ट्रासाठी केली प्रार्थना !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त १८ मे या दिवशी कलकाजी, अलकनंदा येथील श्री संतोषीमाता मंदिराची स्वच्छता करण्यात आली.

श्री क्षेत्र जेजुरीगड आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील विकासकामांना संमती !

श्री क्षेत्र जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याच्या कामास संमती देण्यात आली, तसेच ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करतांना त्या वास्तूची मूळ शैली जपणे आवश्यक असून पुरातत्वीय जाण असलेल्या संस्थेकडून ही कामे करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

श्री तुळजाभवानीदेवीच्या अभिषेक पूजेस २ वर्षांनंतर प्रारंभ !

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीची अभिषेक पूजा चालू करण्याचा निर्णय मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला. कोरोनाच्या निर्बंधामुळे २ वर्षांपासून ही पूजा बंद होती.

(म्हणे) ‘कुतूबमिनार मंदिरांच्या अवशेषांपासून बनवलेले आहे !’ – इतिहासकार इरफान हबीब

कुतूबमिनार कोणत्याही अवशेषपासून बनवलेले नसून ते पूर्वीच हिंदु राजाने बांधलेली मूळ संरचनाच आहे. तो इतिसहाकार आणि पुरातत्व तज्ञ ‘सूर्यस्तंभ’ असल्याचे सांगत आहेत.

कुतूबमिनार परिसरातील २७ मंदिरांचे अवशेष कुणीही नाकारू शकत नाही ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन

कुतूबमिनार येथे पूजा करू देण्याच्या मागणीवर आज सुनावणी

जोपर्यंत मंदिर अन्यत्र स्थलांतरित केले जात नाही आणि मूर्तीचे विसर्जन केले जात नाही, तोपर्यंत मंदिर नेहमीच मंदिर रहाते !

ज्येष्ठ अधिवक्ता श्री. अश्‍विनी उपाध्याय  यांची ज्ञानवापी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका

मंदिरांच्या झालेल्या मशिदीही हिंदूंना पूजेसाठी मिळाव्यात !

भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येणार्‍या आणि बंद असणार्‍या धार्मिक स्थळांना पूजा करण्यासाठी उघडण्यास मान्यता देण्याची शक्यता आहे. या संदर्भातील कायद्यातही सुधारणा केली जाऊ शकते.

पुरातत्व विभागाकडून बंद असलेली हिंदूंची प्राचीन मंदिरे पूजेसाठी उघडण्याची शक्यता !

केवळ हिंदूंची असलेली मंदिरेच नव्हे, तर ज्या मंदिरांवर मुसलमान आक्रमकांनी नियंत्रण मिळवून त्याला इस्लामी वास्तू घोषित करण्यात आल्या आहेत, त्याही हिंदूंना मिळाल्या पाहिजेत, यासाठी केंद्र सरकारने पुरातत्व विभागाला आदेश द्यावा, असेच हिंदूंना वाटते !