श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यातील संगमरवरी फरशी काढण्यास प्रारंभ !

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात गाभार्‍यात बसवण्यात आलेली संगमरवरी फरशी काढण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. कामगार कोणत्याही यंत्राचा वापर न करता पारंपरिक हत्यारे वापरून फरशी काढणार आहेत.

हिमालयातील ५१ शक्तिपीठांच्या संरक्षणासाठी याचिका प्रविष्ट !

हिमालयातील ५१ शक्तिपीठांच्या संरक्षणाच्या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना उत्तराखंड उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकार यांना नोटीस पाठवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना अनावृत्त पत्र

श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मंदिरात पुजारी हे ओबीसी समाजातील गुरव, आदिवासीतील देवऋषी, भटक्या विमुक्त समाजातील नामजोशी, नंदीबैलवाले जोशी, पोपटवाले जोशी, कंदिलवाले जोशी, सुवर्णकार समाजातील दैवज्ञ सुवर्णकार असे सगळेच पूजा करतात. आता सांगा आरक्षण कुठे आहे ? मंदिरांमध्ये कुठल्या ब्राह्मणाने अडवले आहे.

मंगळुरू येथे मशिदीच्या ठिकाणी मंदिराचे अवशेष सापडल्याने जमावबंदी

मशिदीच्या ठिकाणी मंदिराचे अवशेष सापडल्यावर कोणता जमाव आक्रमक होऊन ते अवशेष नष्ट करू शकतो, हे जनता जाणून आहे !

अलवर (राजस्थान) येथील ३०० वर्षे जुन्या शिवमंदिरासह ३ मंदिरे प्रशासन पुन्हा बांधणार !

३०० वर्षे जुन्या शिवमंदिरासह ३ मंदिरे पुन्हा बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती राजगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनीत पंकज यांनी दिली आहे.

‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत सनातन संस्थेच्या वतीने मिरज येथील संत वेणास्वामी मठाची स्वच्छता !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त मठाची स्वच्छता केल्यावर मठाधिपती पू. कौस्तुभबुवा रामदासी यांनी समाधान व्यक्त केले. तसेच कुपवाड येथील शिवमंदिर येथे स्वच्छता करून तेथे साकडे घालण्यात आले.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने अंजुमन इंतजामिया कमिटीची ‘न्यायालय आयुक्तां’च्या नियुक्तीच्या विरोधातील याचिका फेटाळली

न्यायालयाने यापूर्वी ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्‍वनाथ मंदिराची पहाणी करून त्याचे चित्रीकरण करण्याचा आदेश दिला आहे. याचा कमिटीने विरोध केला होता.

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील श्रीकृष्ण मंदिर भोंग्यांचा आवाज न्यून करणार !

श्रीकृष्णजन्मभूमीवरील श्रीकृष्ण मंदिरावर लावण्यात आलेल्या भोंग्यांचा आवाज न्यून करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवाज न्यून ठेवण्याचे आवाहन केले होते.

मंदिरांप्रमाणे मशिदींमध्येही ‘सीसीटीव्ही’ छायाचित्रक लावा ! – बाळा नांदगावकर, मनसे

मंदिरांप्रमाणे मशिदींमध्येही ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावा, असे ट्वीट  मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे.

तिरुपती देवस्थानाला नवी मुंबई येथे व्यंकटेश्वराचे मंदिर उभारण्यास भूखंड देण्यास मंत्रीमंडळाची मान्यता !

यासह मुंबईतील बोरीवली येथील परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रमाच्या धर्मादाय ट्रस्टसाठी भाडेतत्त्वाने देण्यात आलेली भूमीची मुदत ३० वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे.