गोव्यात पुन्हा वीज दरवाढ होणार !

सरासरी दरवाढ १ एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. आता ही दुसरी वीज दरवाढ होणार आहे. वीजदेयके २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. ही योजना तात्काळ लागू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गुन्हा रहित होण्यासाठी छगन भुजबळ यांच्याकडून याचिका प्रविष्ट !

देहली येथील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात स्वतःवरील गुन्हा रहित होण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा, तसेच ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी याचिका प्रविष्ट केली आहे.

राज्यातील आपत्तींचे व्यवस्थापन पहाणारा मंत्रालयातील विभागच आपत्तीमध्ये !

मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षामधीलही अनेक पदे रिक्त आहेत. मंत्रालयीन नियंत्रण कक्ष आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांतील रिक्त पदे भरण्याची मागणी या विभागांकडून करण्यात आली आहे; मात्र राज्य सरकारकडून त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही.

समान नागरी कायद्याशी धर्माचा संबंध जोडणे योग्य नाही ! – मोनिका अरोरा, अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय

प्रत्येकाला स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि स्वाभिमानी जीवन जगण्याचे अधिकार घटनेने दिले असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्त्या मोनिका अरोरा यांनी व्यक्त केले. येथे संभाव्य ‘समान नागरी कायदा’ या विषयावर अधिवक्त्या मोनिका अरोरा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.

संत चरित्र आणि विचारांची चुकीच्या पद्धतीने मांडणी करत भारतीय संस्कृतीला संकटात आणण्याचे प्रयत्न ! – धनंजय देसाई, हिंदु राष्ट्र सेना

संत चरित्र आणि संत विचारांची चुकीच्या पद्धतीने, लबाडीने मांडणी करत भारतीय संस्कृती, सभ्यतेला संकटात आणण्याचे प्रयत्न सध्या खेडोपाडी चालू आहेत. हे रोखण्यासाठी वारकरी कीर्तनकारांनी समाजात जाऊन वर्ग घेत स्वत:ची आध्यात्मिक भूमिका समाजासमोर मांडावी, असे आवाहन हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई यांनी वारकरी संप्रदायाला केले.

नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ‘महाराष्ट्र परिचर्या परिषदे’चे विसर्जन !

मनुष्यबळ आणि वित्तीय साधने यांचा अपव्यय, तसेच अन्य शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यशासनाने ‘महाराष्ट्र परिचर्या परिषद’ तडकाफडकी विसर्जित केली आहे. नव्याने स्थापना होईपर्यंत या परिषदेवर ‘प्रशासक’ म्हणून जे.जे. रुग्णालयातील साहाय्यक प्राध्यापक डॉ. अनंत शिनगारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

सातारा येथील स्नेहल मांढरे हिला ‘शिवछत्रपती’ राज्य क्रीडा पुरस्कार घोषित !

धनुर्विद्या खेळात उत्तुंग कामगिरी केल्याविषयी येथील स्नेहल विष्णु मांढरे हिला राज्यशासनाच्या वतीने वर्ष २०१९-२० या कालावधीतील ‘शिवछत्रपती’ हा राज्य क्रीडा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

१९ ते २२ जुलै या काळात राज्यात पावसाचा जोर वाढणार !

हवामान विभागाने १७ जुलै या दिवशी रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला, तर १८ जुलै या दिवशी रत्नागिरी, रायगड आणि पुणे जिल्ह्याला ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ दिला आहे. या काळात बहुतेक ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतीवृष्टीची शक्यता आहे. 

जेजुरी (पुणे) येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम मंत्री येणार नसल्याने रहित झाल्यामुळे प्रशासनाचे २ कोटी रुपये वाया !

३ वेळा कार्यक्रमाचा दिनांक पालटूनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहू न शकल्याने पुरंदर जिल्ह्यातील जेजुरी येथे १३ जुलै या दिवशीचा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.

मनसेच्या पाठपुराव्यानंतर अतिक्रमण हटवण्यासाठी ट्रस्टला वन विभागाची ८ दिवसांची समयमर्यादा !

वन विभाग झोपा काढत असल्यामुळेच सरकारजी जागांवर अशा प्रकारे अतिक्रमण होते. त्यामुळे अतिक्रमण हटवण्यासह ते होण्यास कारणीभूत असलेल्या संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करा !