यापुढे बडव्‍यांची अपकीर्ती करण्‍याचा प्रयत्न केल्‍यास त्‍याच भाषेत उत्तर देऊ !

बडवे कुटुंबियांनी पंढरपूरच्‍या श्री विठ्ठलाची मागील सहस्रो वर्षे अविरत सेवा केली आहे. त्‍यामुळे त्‍यांचा अवमान थांबवा, असे आवाहन नाशिक येथील काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांनी केले आहे.

सनदी अधिकार्‍यांना देणार छत्रपती शिवरायांच्‍या राजकारभाराचे धडे !

शिवरायांच्‍या राजकीय कारकिर्दीतील अनुभव, कार्य आणि संदर्भ यांचे संकलन, संपादन आणि प्रकाशन करण्‍यासाठी राज्‍यशासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती’ स्‍थापन केली आहे.

तिरंग्‍याच्‍या आडून कुणी भगव्‍या ध्‍वजाला विरोध करत असेल, तर सकल हिंदु समाज खपवून घेणार नाही ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन

पंतप्रधानांच्‍या नावे दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे की, देश स्‍वतंत्र्य होऊन हिंदु समाज अजूनही अत्‍याचार सहन करत आहे. त्‍यामुळे भारत देशाला ‘हिंदु राष्‍ट्र’ घोषित करावे, अशी मागणी आहे.

महिलांवरील अत्‍याचाराची संख्‍या अल्‍प होत नाही ! – रूपाली चाकणकर, अध्‍यक्षा, राज्‍य महिला आयोग

कोल्‍हापूर, ७ जुलै (वार्ता.) – गेले वर्षभर मी महिला आयोगाच्‍या निमित्ताने सुनावणी घेण्‍यासाठी राज्‍यभर फिरत आहे. प्रत्‍येक ठिकाणी गेल्‍यावर सुनावणीसाठी महिला अल्‍प संख्‍येने अल्‍प असतील असा विचार करते; मात्र त्‍यांची संख्‍या वाढलेलीच दिसते. त्‍यामुळे दुर्दैवाने महिलांवरील अत्‍याचारांची संख्‍या वाढलेलीच दिसते, तसेच महिलांवरील अत्‍याचारांविषयी महाराष्‍ट्रात जागृती नाही, त्‍यासाठी समाजाची मानसिकता पालटली पाहिजे, असे मत राज्‍य महिला … Read more

ठाकरे गटाच्या उपनेत्या डॉ. नीलम गोर्‍हे यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश !

सुषमा अंधारे यांनी प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटातील महिला नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा होत असल्याच्या संदर्भात ‘सटरफटर लोकांमुळे नाराज होण्यासारखी परिस्थिती नाही’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

मुंबईतील श्री मुंबादेवी आणि श्री महालक्ष्मीदेवी देवस्थानांच्या परिसराचा विकास करणार ! – दीपक केसरकर, पालकमंत्री, मुंबई

मुंबईमध्ये १ एकर भूमीत अत्याधुनिक मत्स्यालयाची निर्मिती केली जाणार आहे. राज्यशासन आणि महानगरपालिका यांद्वारे हा संयुक्त प्रकल्प राबवला जाणार आहे.

सिंधुदुर्ग : पावसाळ्यातही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने कोळंब ग्रामस्थ संतप्त

‘निसर्गाने दिले; पण निष्क्रीयतेमुळे गमावले’,  अशी स्थिती निर्माण करणारे प्रशासन !

राज्यसभेच्या एका जागेसाठी गोव्यात २४ जुलैला निवडणूक

भाजपकडून प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचे नाव निश्चित झाले आहे, तर घोषणेची औपचारिकता केवळ बाकी आहे. विरोधी काँग्रेस पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने त्यांनी ही निवडणूक गंभीरपणे घेतलेली नसल्याचे दिसत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस

जिल्ह्यात गेले २ दिवस मुसळधार पाऊस पडत असून नदी, नाले यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच काही ठिकाणी वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

गोवा राज्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी चालूच : जनजीवन विस्कळीत

बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले चक्रीय वारे, तसेच अल्प दाबाचा पट्टा यांमुळे राज्यात ५ जुलैपासून मुसळधार पाऊस चालू आहे. हवामान खात्याने आजही येलो अलर्टची, तर पुढील ४ दिवस काही ठिकाणी ऑरेंज अलर्टची चेतावणी दिली आहे.