प्रभु श्रीरामांचे विडंबन करणार्‍या आस्थापनाच्या विरोधात बांदा येथील रामभक्तांचे ‘त्याग’ आंदोलन वर्षभर चालू

कोणतीही तोडफोड नाही. अपशब्द नाही. ‘बॅनरबाजी’ नाही, तसेच आस्थापनाचे नावही न घेता आंदोलन चालू आहे. या आंदोलनाचा परिणाम म्हणजे ‘ते’ वादग्रस्त विज्ञापन दूरदर्शन वाहिन्यांवर दाखवण्याचे प्रमाण उणावले !

‘झोमॅटो’च्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

झोमॅटोच्या विज्ञापनातून हा अवमान करण्यात आला होता. या विज्ञापनामध्ये अभिनेते हृतिक रोशन यांनी काम केले होते. त्यामुळे हृतिक रोशन, झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपिंदर गोयल यांच्या विरोधात ही तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

हिंदुद्वेषी नियतकालिक ‘द वीक’ने प्रकाशित केले भगवान शंकर आणि कालीमाता यांचे अश्‍लाघ्य चित्र !

हिंदु देवतांचे विडंबन करणारी ‘द वीक’सारखी नियतकालिके कधीतरी मुसलमान किंवा ख्रिस्ती यांच्या श्रद्धास्थानांचा अनादर करतात का ? हिंदूंच्याच पैशांवर मोठ्या झालेल्या अशा नियतकालिकांवर आता हिंदूंनी बहिष्कार घालून त्यांना वठणीवर आणले पाहिजे !

अशासकीय संस्थांची (‘एन्.जी.ओ.’ची) विश्वासार्हता !

विदेशातून निधी मिळवून देशातील विकासकामांना स्थगिती आणणार्‍या अशासकीय संस्थांचे खरे स्वरूप सरकारने उघड करावे !

स्थानिक हिंदूंना नोकरीमध्ये ५० टक्के आरक्षण दिले नाही, तर आस्थापन बंद करू !

मानेसर (हरियाणा) येथील ‘हमदर्द’ आस्थापनाला महापंचायतीची चेतावणी

हिंदु धर्माच्या विरोधात लिखाण करणार्‍या प्रसिद्धीमाध्यमांना न्यायालयात उत्तर द्यावे लागेल ! – अधिवक्ता नागेश जोशी, सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद, गोवा

हिंदुत्वनिष्ठांना खोट्या आरोपांमध्ये नाहक गोवणार्‍यांचा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात धिक्कार !

अमेरिकेच्या ‘गूगल’मधील हिंदु कर्मचाऱ्यांच्या संघटित विरोधामुळे हिंदुद्वेष्ट्या विचारवंत सुंदरराजन् यांचा कार्यक्रम रहित !

गूगलमधील संबंधित हिंदु कर्मचाऱ्यांचे अभिनंदन ! वास्तविक हिंदु धर्मात जातीवाद नाही. त्यामुळे एका हिंदुद्वेष्टीला बोलावून त्याविषयी मार्गदर्शन करायला सांगणे, हाच हिंदुद्वेष !

हिंदुद्वेषाची परमावधी !

आज अमेरिकेतील निम्म्याहून अधिक जनता योगाकडे वळली असतांना सनातन वैद्यकीय परंपरेचा उद्घोष करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निलंबनासारखी शिक्षा देणाऱ्या हिंदुद्वेष्ट्यांचा फार काळ टिकाव लागणार नाही, हे त्यांनी ध्यानात घ्यावे. जगाला सनातन भारतीय संस्कृतीविना पर्याय नसतांना स्टॅलिन यांच्यासारखे लोक येत्या काळात कुठे असतील ? याचे त्यांनी चिंतन करावे !

हिंदु संस्कृतीचा सन्मान ठेवणार नसाल, तर बहिष्कारास्त्राचा वापर करू ! – हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांची चेतावणी

‘अक्षय्य तृतीया’ या हिंदु सणाच्या निमित्ताने ‘मलाबार गोल्ड अँड डायमंड’ने विज्ञापनाद्वारे हेतूतः हिंदु समाजाच्या भावना दुखावण्याचा, हिंदु संस्कृतीचे हनन करण्याचा प्रयत्न केला.

‘मलबार गोल्ड’चा हिंदुद्वेष !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात राहून ही आस्थापने, संघटना, संस्था हिंदुविरोधी कारस्थाने रचत असतांना त्यांना वैध मार्गाने विरोध करण्याची कृती सर्वाेत्तम आहे. हिंदूंचा सन्मान विज्ञापनकर्ता, अभिनेते, अभिनेत्री, चित्रपट अथवा मालिका निर्माते यांनी राखणे आवश्यकच आहे, अन्यथा वैध मार्गाने विरोध ठरलेलाच आहे, हे निश्चित !