एकरूपतेची प्रक्रिया !
‘एक थेंब पाणी समुद्रात टाकले, तर ते समुद्राशी एकरूप होते. तसा राष्ट्रभक्त राष्ट्राशी एकरूप होतो आणि साधक परमात्म्याशी एकरूप होतो.’
‘एक थेंब पाणी समुद्रात टाकले, तर ते समुद्राशी एकरूप होते. तसा राष्ट्रभक्त राष्ट्राशी एकरूप होतो आणि साधक परमात्म्याशी एकरूप होतो.’
‘नागरिकांच्या आध्यात्मिक उन्नतीवरून राष्ट्राच्या विकासाचे मोजमापन केले जायला हवे; कारण भौतिक विकास कितीही झाला आणि आत्मिक (किंवा नैतिक) विकास साध्य झाला नाही, तर त्या भौतिक विकासाला काय अर्थ आहे ?’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
‘हिंदु सोडून इतर धर्मांतील एकही जण ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणत नाही. ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणाऱ्या हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे, तर न म्हणणाऱ्या इतर धर्मांतील सर्वांची स्थिती हिंदूंपेक्षा पुष्कळ चांगली आहे.’
‘हिंदु राष्ट्र’ म्हटले की, त्याकडे ‘हिंदूंचे राष्ट्र’ अशा काहीशा संकुचित अर्थाने पाहिले जाते. तथापि ‘हिंदु राष्ट्र’ ही मानव, पशू, पक्षी, किडा, मुंगी, वृक्ष, वेली आदींपासून सूक्ष्मातीसूक्ष्म जिवांच्या उद्धाराचा विचार बाळगणारी एक ईश्वरसंकल्पित सामाजिक व्यवस्था असेल; म्हणून तिला ‘ईश्वरी राज्य’ म्हणता येईल.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
‘उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयाण करतात, त्याप्रमाणे साधना आणि हिंदु धर्म यांच्या शिक्षणासाठी जगभरचे जिज्ञासू अन् साधक भारतात येतात. असे असले, तरी भारतातील हिंदूंना हिंदु धर्माचे मूल्य नाही.’
‘हिंदूंनो, स्वतःसमवेत राष्ट्र आणि धर्म यांचाही विचार करा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘हिंदु राष्ट्रात (सनातन धर्म राज्यात) नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींचा वापर केवळ धर्मशिक्षण आणि साधना यासंदर्भात केला जाईल. त्यामुळे गुन्हेगार नसतील आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी असतील.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’निमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश !
विज्ञान पृथ्वीतत्त्वाशी संबंधित विषयांशी निगडित आहे, तर अध्यात्म ‘पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश’ ही पंचमहाभूते आणि निर्गुण तत्त्व यांच्याशी संबंधित आहे; म्हणूनच विज्ञान पृथ्वीबाहेरील इतर पृथ्वींचाही अभ्यास करते…
‘ज्यांनी सर्व धर्मांचा अभ्यासच काय; पण वाचनही केले नाही, तेच ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात !’