हिंदु राष्ट्राच्या फलश्रुतीच्या संदर्भातील दृष्टीकोन !

‘जेव्हा हिंदु राष्ट्र येईल, तेव्हा आपण सर्व जण मागील बाकड्यांवर (बॅकबेंचर) बसलेले असू आणि हिंदु राष्ट्राचे विजय ढोलक वाजवणारे दुसरे कुणीतरी असतील ! आपल्याला केवळ समाधान असेल की, आपण काळानुसार कार्य केले.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

ईश्‍वराच्या विश्‍वात सर्वांत महत्त्वाचे काय ?

‘भारतात ‘भारतरत्न’ सर्वाेच्च पद आहे. जगात ‘नोबेल प्राईज’ सर्वाेच्च पद आहे, तर सनातन उद्घोषित करत असलेली ‘जन्म-मृत्यूतून सुटका’ आणि ‘संत’ ही पदे ईश्वराच्या विश्वात सर्वांत महत्त्वाची आहेत !’

राष्ट्ररचना करणे राजकारण्यांचे काम नव्हे !

‘राष्ट्ररचना ही एक शास्त्रीय प्रक्रिया आहे आणि तिच्यात केवळ सत्याला स्थान आहे. राजकारणाचा मुख्य हेतू ‘सत्ता संपादन करणे आणि टिकवणे’, हा असतो. त्यामुळे सत्ताग्रस्त राजकारणी लोकांकडून ‘राष्ट्ररचना’ होणे सर्वथा अशक्य आहे.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

प्रत्येक पिढीचे कर्तव्य !

‘प्रत्येक पिढी पुढील पिढीकडे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात अपेक्षेने पहते. याऐवजी प्रत्येक पिढीने ‘आम्हाला काय करता येईल ?’, असा विचार करून असे कार्य केले पाहिजे की, पुढच्या पिढीला त्यांसंदर्भात काही करण्याची आवश्यकता न उरल्याने ती सर्व वेळ साधनेला देऊ शकेल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

आंदोलनांतून राष्ट्राची हानी करू नका !

‘समाजावरील अन्यायाच्या विरोधात आंदोलन करण्याचा अधिकार जनतेला आहे; मात्र त्यात सार्वजनिक संपत्तीची हानी करणे, बंद पाळणे, बस-रेल्वे पेटवून देणे इत्यादी विध्वंसक कृत्यांमुळे राष्ट्राचीच हानी होते. त्यामुळे कोणत्याही आंदोलनांतून राष्ट्राची हानी करू नका !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

खरा बुद्धीवान !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो आणि विज्ञानवाद्यांनो, ‘वैज्ञानिकांना शोध लावण्याची बुद्धी कुणी दिली ?’, याचा कधी विचार केला आहे का ? ती बुद्धी ईश्वराने दिली आहे. असे असतांना ‘ईश्वर नाही’, असे कुणी खरा बुद्धीवान म्हणेल का ?’

वृक्षारोपण राजकारण्यांच्या हस्ते नको, तर संतांच्याच हस्ते करा !

‘वृक्षारोपण राजकारण्यांच्या हस्ते नको, तर संतांच्याच हस्ते करा ! जसे बी, तसे फळ येते; म्हणूनच राजकारण्यांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना रज-तमात्मक अहंकाराची, तर संतांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना साधकत्व निर्माण करणारी फळे येतात !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

हिंदु राष्ट्रातील राजकारणी कसे असतील ?

‘हिंदु राष्ट्रात ‘स्वतःकडे सत्ता असावी’, अशा विचाराचे स्वार्थी आणि अहंभावी राजकारणी नसतील, तर ‘मानवजातीने साधना करून ईश्वरप्राप्ती करावी’, या विचाराचे धर्मसेवक आणि राष्ट्रसेवक असतील !’

सर्व समस्यांवर एकच उत्तर : हिंदु राष्ट्राची स्थापना !

‘सर्व रोगांना एकच औषध किंवा सर्व दाव्यांना एकच कायदा नसतो; पण राष्ट्र आणि धर्म यांच्या सर्व समस्यांना एकच उत्तर आहे अन् ते म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’

भौतिक विकासाच्या दृष्टीने धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !

धर्म ही अशी गोष्ट आहे की, जी काम, क्रोध, लोभ आदी षड्रिपूंवर विजय मिळवण्यास शिकवते. त्यामुळे केवळ भौतिक विकास साध्य करून नाही, तर लोकांना धर्म शिकवून नीतीमान बनवणेही तितकेच आवश्यक आहे.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले