हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व !
‘हिंदु धर्मात सांगितले आहे तितके सखोल ज्ञान इतर एकातरी पंथात आहे का ? विज्ञानाला तरी ज्ञात आहे का ?’
‘हिंदु धर्मात सांगितले आहे तितके सखोल ज्ञान इतर एकातरी पंथात आहे का ? विज्ञानाला तरी ज्ञात आहे का ?’
‘निरक्षराने ‘सर्व भाषांतील अक्षरे सारखीच असतात’, असे म्हणणे, जसे म्हणणार्याचे अज्ञान दाखवते, त्याचप्रमाणे ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे त्यांचे अज्ञान दाखवतात. ‘सर्व औषधे, सर्व कायदे सारखेच आहेत’, असे म्हणण्यासारखे ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणे आहे.’
‘अनिष्टांपासून जगाचे रक्षण करणारे, तसेच मानवाला ऐहिक आणि पारलौकिक उन्नतीसह मोक्ष मिळवून देणारे तत्त्व म्हणजे धर्म ! बहुतेक विदेशी भाषांत ‘धर्म’ शब्दाला समानार्थी शब्दही नाही ! असे असल्यामुळे त्यांना धर्माचरण करणे कठीण जाते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘कुठे एखाद्या विषयाचे काही वर्षे संशोधन करून संख्याशास्त्रावरून (Statistics वरून) निष्कर्ष काढणारे पाश्चात्त्य संशोधक, तर कुठे कुठल्याही प्रकारचे संशोधन न करता मिळणार्या ईश्वरी ज्ञानामुळे कुठल्याही विषयांवरील निष्कर्ष तात्काळ सांगणारे ऋषि !’
‘कुठे पुढील काही वर्षांत काय होणार, याचा अंदाज बुद्धीचा वापर करून सांगणारे पाश्चात्त्य, तर कुठे युगायुगांच्या संदर्भात सांगणारे ज्योतिषशास्त्र !’
जन्मल्यापासून आतापर्यंत प्रत्येक प्रसंगात देवाने मला कसे साहाय्य केले ?’ तसेच ‘तो मला साधनेत सतत साहाय्य करत आहे’, हे आठवून कृतज्ञता व्यक्त करावी.
‘पाश्चात्त्यांना संशोधनासाठी यंत्रे लागतात. ऋषींना आणि संतांना लागत नाहीत. त्यांना यंत्रांच्या अनेक पटींनी माहिती मिळते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘एका अब्जाधिशाच्या मुलाने त्याची सर्व संपत्ती उधळून टाकावी, तशी हिंदूंच्या मागच्या पिढ्यांनी सर्व धर्मसंपत्ती मातीमोल केली आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्वजण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाईम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी १ घंटा सेवा करायला कुणीही सिद्ध नसतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘स्वार्थासाठी मागण्या करणारे नव्हे, तर त्याग करणारेच हिंदु राष्ट्र आणतील !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले