हिंदु राष्ट्रात गुन्हेगार नसतील !

‘समाज सात्त्विक होण्यासाठी धर्मशिक्षण न देता केवळ गुन्हेगारांना शिक्षा करून गुन्हे टाळता येत नाहीत, हेही न कळणारे आतापर्यंतचे शासनकर्ते ! हिंदु राष्ट्रात सर्वांना धर्मशिक्षण दिल्याने गुन्हेगारच नसतील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘आंधळे’ बुद्धीप्रामाण्यवादी !

‘एखाद्या आंधळ्याने दृश्याचे वर्णन करावे, याप्रमाणे धर्माचे शून्य ज्ञान असलेल्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे धर्मासंदर्भातील बोलणे असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भारत पुन्हा ‘विश्‍वगुरु’ होण्यासाठी कशाची आवश्यकता ?

‘भारतात इतर काही आयात करण्यापेक्षा राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नेते आयात करा. मग इतर काहीच आयात करावे लागणार नाही. भारत पुन्हा विश्‍वगुरु होईल आणि गतवैभव प्राप्त करील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंचे धर्मांतरच होऊ नये, यासाठी प्रयत्न करा !

‘धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात घेण्याचे कार्य करण्यापेक्षा ‘हिंदू धर्मांतरित होणार नाहीत’, हे कार्य करणे अधिक महत्त्वाचे आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पैशाचा ‘त्याग’ अधिक सुलभ !

‘पैसा मिळवण्यापेक्षा त्याचा त्याग करणे अधिक सुलभ आहे, तरी मानव तो करत नाही, हे आश्‍चर्य आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

धर्मबंधनाचे महत्त्व !

‘व्यक्तीस्वातंत्र्याने मानव भरकटत जातो; कारण तो सात्त्विक नाही. असे होऊ नये; म्हणून त्याला धर्मबंधन हवे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ईश्‍वरी राज्याचे कल्पनातीत महत्त्व !

‘अनेक गुन्हे करून आत्महत्या करणार्‍याला सरकार कशी शिक्षा करणार ? ईश्‍वर मात्र करतो. यावरून ईश्‍वराचे राज्य किती कल्पनातीत आहे, हे लक्षात येते. त्यामुळे ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्नरत रहा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘आदर्श समाज’ दाखवा !

‘अधोगतीला गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब कथा, नाटके, कादंबर्‍या, चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका इत्यादींत न दाखवता त्यांत समाजाला दिशा देणारा आदर्श समाज दाखवणे सर्वांकडून अपेक्षित आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

धर्मकार्यार्थ ईश्‍वराचा आशीर्वाद कसा प्राप्त कराल ?

‘ईश्‍वराच्या प्राप्तीसाठी आपण धडपड केली, तर ईश्‍वराचे लक्ष आपल्याकडे वेधले जाते आणि आपण करत असलेल्या धर्मकार्यासाठी ईश्‍वराची कृपा अन् आशीर्वाद प्राप्त होतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंची विनाशाकडे वाटचाल !

‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्‍चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म आणि मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू हे पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले