धर्मविरोधकांच्या विचारांचे खंडण आवश्यक !

‘धर्मविरोधकांच्या विचारांचे खंडण करणे, ही समष्टी साधनाच आहे ! ‘यामुळे ‘धर्मविरोधकांचे विचार अयोग्य आहेत’, हे काही जणांना तरी पटते आणि ते योग्य मार्गाने वाटचाल करतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र अपरिहार्य !

नैतिकता आणि आचारधर्म बालपणापासून न शिकवणारे पालक अन् शासन यांच्यामुळे भारतात सर्वत्र अनाचार, राक्षसी वृत्ती प्रबळ झाल्या आहेत. ‘या स्थितीमुळे बलात्कार, भ्रष्टाचार, विविध गुन्हे, देशद्रोह आणि धर्मद्रोह यांचे प्रमाण अपरिमित होऊन देश रसातळाला गेला आहे. त्यावर उपाय एकच आणि तो म्हणजे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वर्तमानकाळाचे सोने करा !

‘अध्यात्मात भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचे मूल्य शून्य आहे. त्यामुळे भूत-भविष्याच्या विचारांत न अडकता वर्तमानकाळाचे सोने करा !’ – श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

म्हणे सर्वधर्मसमभाव !

‘बालवाडीतील मुलगा आणि पदव्युत्तर शिक्षण झालेला तरुण यांचे शिक्षण सारखेच आहे’, असे आपण म्हणत नाही. तशीच स्थिती इतर तथाकथित धर्म आणि हिंदु धर्म यांच्यात असतांना ‘सर्वधर्मसमभावा’चा घोष करणे, यासारखे दुसरे अज्ञान नाही. ‘प्रकाश आणि अंधार समान आहेत’, असे म्हणणार्‍या आंधळ्यासारखे ‘सर्वधर्मसमभावी’ झाले आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा विजयादशमीनिमित्त संदेश !

आज शत्रू काश्मीरची सीमा नव्हे, तर देहलीपासून गल्लीपर्यंत हिंदूंना लक्ष्य करत असतांना आम्ही घरात बसून अपराजितेचे पूजन करणे, तसेच गावाच्या वेशीवरील मंदिरात दर्शन घेणे, ही औपचारिकता पूर्ण करत आहोत. हिंदूंनो, ही विजयादशमी नव्हे !

विविध विषयांतील तज्ञ आणि संत

‘व्यावहारिक जीवनात डोळ्यांच्या डॉक्टरांना डोळ्यांचा आजार होतो . . . परंतु अध्यात्मात संतांना इतरांचे आध्यात्मिक त्रास दूर केल्यावर आध्यात्मिक त्रास होत नाहीत. काही संतांना शारीरिक त्रास होत असले, तरी ते देहप्रारब्धानुसार असतात. त्याचा संतांवर परिणाम होत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आधीच्या युगांत स्वभावदोष अल्प असल्याने एखाद्या साधनामार्गाने साधना करून साधक पुढे जात.

आधीच्या युगांत स्वभावदोष अल्प असल्याने एखाद्या साधनामार्गाने साधना करून साधक पुढे जात.

धर्मातील आश्रमप्रणालीचा अर्थ !

‘हिंदु धर्मात ‘वर्णाश्रम’, म्हणजे वर्ण आणि आश्रम ही जीवनपद्धत सांगितली आहे. त्यातील वर्ण म्हणजे जात नव्हे, तर साधनेचा मार्ग. आश्रम चार आहेत. त्याचे महत्व हे की, ‘जीवनाच्या चारही टप्प्यांत आश्रमवासियाप्रमाणे जीवन जगावे’, याची आठवण करून देणे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंची झपाट्याने विनाशाकडे वाटचाल !

‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्‍चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म आणि मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मुले असंस्कारी असल्याचा परिणाम !

‘ मातृदेवो भव । पितृदेवो भव ।’ म्हणजे ‘आई आणि वडील यांना देव मानावे’, असे मुलांवर बालपणी संस्कार न करणाऱ्या आईवडिलांसंदर्भात मोठ्या झालेल्या मुलांची वृत्ती ‘गरज सरो वैद्य मरो ।’ अशी होते. त्यामुळे ती आई-वडिलांना वृध्दाश्रमात ठेवतात, यात आश्चर्य ते काय ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले