कृतघ्न तरुण !
‘ज्या आई-वडिलांनी जन्म दिला आणि लहानाचे मोठे केले, त्यांची काळजी त्यांच्या म्हातारपणात हल्लीचे बरेच कृतघ्न तरुण घेत नाहीत. आई-वडिलांची काळजी न घेणारे देवाचे काही करतील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘ज्या आई-वडिलांनी जन्म दिला आणि लहानाचे मोठे केले, त्यांची काळजी त्यांच्या म्हातारपणात हल्लीचे बरेच कृतघ्न तरुण घेत नाहीत. आई-वडिलांची काळजी न घेणारे देवाचे काही करतील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘भारतातील हिंदूंनाच नव्हे, तर जगातील मानवजातीला आधार वाटतो हिंदु धर्माचा ! त्यामुळे जगभरचे जिज्ञासू अध्यात्म शिकण्यासाठी भारतात येतात. बुद्धीप्रामाण्यवादी, धर्मविरोधी आणि साम्यवादी यांचे तत्त्वज्ञान शिकण्यासाठी भारतात कुणीही येत नाही; पण हेही त्यांच्या लक्षात येत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘काम न करणे, भ्रष्टाचार करणे इत्यादींची सवय झालेले बहुतेक पोलीस आणि सरकारी कर्मचारी अन् अधिकारी यांना एकही खासगी आस्थापन एकही दिवस नोकरीत ठेवणार नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘आद्य शंकराचार्यांनी भारतात सर्वत्र फिरून हिंदु धर्माच्या विरोधकांबरोबर वाद-विवादात त्यांना जिंकून हिंदु धर्माची पुनर्स्थापना केली. त्या काळचे विरोधक वाद-विवाद करत. याउलट हल्लीचे धर्मविरोधक वाद-विवाद न करता केवळ शारीरिक आणि बौद्धिक गुंडगिरी करतात.‘ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद निर्माण करणार्यांनी हिंदूंमध्ये दुही निर्माण केली. त्यामुळे हिंदु आणि भारत यांची स्थिती बिकट झाली आहे; म्हणून दुही करणारे राष्ट्र आणि धर्म विरोधी होत !’
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना कधी विश्वबुद्धीतून ज्ञान मिळते का ? ‘विश्वबुद्धी’ असे काहीतरी आहे आणि विश्वबुद्धीतून ज्ञान मिळते, हे तरी त्यांना ठाऊक आहे का ? ठाऊक नसल्यानेच ते बालवयातील मुले बडबडतात, तसे बडबडतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘हिंदु राष्ट्रात, म्हणजेच रामराज्यात लहानपणापासूनच साधना करवून घेण्यात येत असल्यामुळे व्यक्तीतील रज-तम गुणांचे प्रमाण अल्प होऊन व्यक्ती सात्त्विक बनते. त्यामुळे ‘गुन्हा करावा’, असा विचारही तिच्या मनात येत नाही ! साधनेमुळे सर्व प्रजा सात्त्विक असल्यामुळे कुणी गुन्हा करत नाही ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘कुठे स्वेच्छेने वागण्यास उत्तेजन देऊन मानवाला अधोगतीला नेणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे मानवाला स्वेच्छेचा त्याग करायला शिकवून ईश्वरप्राप्ती करून देणारे संत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘कठीण समय येता कोण कामास येतो ?’ या प्रश्नाचे उत्तर आहे, ‘कठीण समय येता देवच कामास येतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘पाश्चात्त्य देशांत अन्न-वस्त्र-निवारा असूनही मानसिक अस्वास्थ्यामुळे तेथील नागरिक आत्महत्या करतात. याउलट भारतातील जनतेच्या अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजाही स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सरकारांनी पूर्ण न केल्यामुळे येथील नागरिक आत्महत्या करतात. हे टाळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले