खरे प्रदूषणनिवारण करायचे असेल, तर प्रथम मनातले प्रदूषण दूर करा !

प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या रज-तमप्रधान मनाला आणि बुद्धीला साधनेने सात्त्विक न बनवता, म्हणजे मुळावर उपाय न करता केलेले वरवरचे उपाय हास्यास्पद आहेत. क्षयरोग झालेल्याला खोकल्यासाठी औषध देण्यासारखे आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कुठे ३५०० वर्षांत निर्माण झालेले विविध धर्म (पंथ), तर कुठे अनादि हिंदु धर्म !

. . . मग त्यापूर्वी या जगात कोण होते ? केवळ हिंदू होते. हिंदु धर्म हा अनादि आणि अनंत आहे आणि सर्वांचा मूळ धर्म हा हिंदूच आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

तृतीय महायुद्धाच्या काळात स्वत:ला वाचवण्यासाठी साधना करा !

‘कोणताही राजकीय पक्ष तृतीय महायुद्धाच्या काळात हिंदूंचे रक्षण करू शकणार नाही; कारण त्यांच्याकडे आध्यात्मिक बळ नाही. त्या काळात स्वतःला वाचवण्यासाठी आतापासून साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राष्ट्रविरोधी व्यक्तिस्वातंत्र्यवाले !

‘व्यक्तीपेक्षा समाज आणि समाजापेक्षा राष्ट्र महत्त्वाचे आहे, हे न समजणारे व्यक्तीस्वातंत्र्यवाले देशाला विनाशाकडे नेत आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अहंकारी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मला सर्व कळते’, असा अहंकार असतो. त्यामुळे काही जाणून घ्यायची जिज्ञासा नसल्याने बुद्धीपलीकडील अध्यात्मशास्त्र त्यांना मुळीच ज्ञात नसते आणि तरीही ते अध्यात्मातील अधिकारी संतांवर टीका करतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेल्या देवाचे अस्तित्व नाकारणारे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘कर्त्याने बनवलेली गोष्ट कर्त्यापेक्षा कधीच श्रेष्ठ असू शकत नाही, उदा. सुताराने बनवलेली आसंदी (खुर्ची). असे असतांना देवाने बनवलेले काही मानव मात्र सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेल्या देवालाच क्षुल्लक समजतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हास्यास्पद बुद्धीप्रामाण्यवादी !

‘जन्मांधाने ‘दृष्टी, दिसणे असे काही आहे’, असे मानणे ही अंधश्रद्धा आहे’, असे म्हणावे, तसे बुद्धीप्रामाण्यवादी ‘सूक्ष्म दृष्टी असे काही आहे’, असे मानणे, ही अंधश्रद्धा आहे’, असे म्हणतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांची निरर्थकता !

‘आद्य शंकराचार्य आणि समर्थ रामदासस्वामी यांच्या वेळी बुद्धीप्रामाण्यवादी नव्हते, हे बरे. नाहीतर त्यांनी मुलांना घरदार सोडून आश्रमात जायला साधना करायला विरोध केला असता आणि जग त्यांच्या अप्रतिम ज्ञानाला कायमचे मुकले असते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ईश्वरप्राप्तीचे महत्त्व !

‘एखाद्याने एखादी वस्तू दिली, तर घेणार्‍याला आनंद होतो. यापुढे गेल्यावर वस्तू देणाराच मिळाला, तर त्याला किती आनंद होईल ! ईश्वरच सर्व गोष्टी देणारा असल्याने त्याच्या प्राप्तीने सर्वाेच्च आनंद होतो !’

अत्यंत दयनीय झालेली हिंदूंची स्थिती !

‘धर्मशिक्षणाच्या अभावी आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी निर्माण केलेल्या विकल्पांमुळे हिंदूंना हिंदु धर्माचे अद्वितीयत्व ज्ञात नसल्यामुळे त्यांना धर्माभिमान नाही; म्हणून त्यांची स्थिती जगातील सर्वधर्मियांत अत्यंत दयनीय झाली आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले