देवाला आपल्याला जे द्यायचे आहे, ते देव देतोच असतो, त्यात स्वेच्छा नको !

ज्या ठिकाणी आपले उत्तर अचूक येते, ते देवानेच दिलेले असते. आपल्याला एवढ्या विषयांची माहिती नसते.         

सद्गुरु स्वाती खाडये यांच्याविषयी पुणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. स्नेहल पाटील यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

हिंदु राष्ट्र-जागृती सभांमधील सद्गुरु स्वातीताईंच्या छायाचित्रांतून क्षात्रतेज प्रक्षेपित होऊन अंगावर रोमांच येतात आणि भाव जागृत होतो.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांमुळे औषधोपचारांचा लाभ होऊन कर्करोगासारख्या दुर्धर आजारातून बरे झाल्याची साधिकेच्या नातेवाइकाला आलेली अनुभूती !

‘आजारपणात रुग्णाने आणि त्याच्या नातेवाइकांनी नामजपादी उपाय केल्यास त्यांना कसा लाभ होतो ?’, याविषयीच्या अनुभूतींचा काही भाग २४.४.२०२४ या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहू.

बालपणापासूनच एकलव्याप्रमाणे साधनारत असलेल्या आणि कुटुंबियांना साधना करण्यास प्रोत्साहन देणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीरा सामंत (वय ९० वर्षे)!

२४.४.२०२४ या दिवशी श्रीमती मीरा सामंत यांच्या साधना प्रवासातील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.

ईश्वर आणि गुरु यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी (वय ७२ वर्षे) !

‘माझी आई श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी हिच्या अंगी भगवंताच्या कृपेने अनेक कलागुण असून ती प्रत्येक कृती साधना म्हणून करते. मला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘सगळे ईश्वरेच्छेने होते’, हे लक्षात घेतल्यावर नेहमी आनंदी रहाता येते !

काळानुसार काय होणार आणि नाही होणार, ते आपण शिकत जायचे. पुढे आपल्याला कोणतीच इच्छा रहात नाही आणि ‘देवा, तू करशील, ते करशील’, अशी आपली विचारप्रक्रिया होते, मग आपण नेहमी आनंदी असतो.

भक्तीसत्संगात सांगितलेली एका भक्ताची कथा ऐकून साधकाला त्याच्या अयोग्य विचारप्रक्रियेची झालेली जाणीव !

‘२२.२.२०२४ या दिवशी भक्तीसत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितलेली कथा ऐकून मला माझ्या अयोग्य विचारप्रक्रियेची जाणीव झाली.

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ हसतांना त्यांच्या मुखातील पोकळीत ब्रह्मांड सामावले आहे’, असे जाणवणे

‘२३.१०.२०२३ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात नवरात्रीनिमित्त यज्ञ चालू असताना यज्ञाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ हसत असतांना, ‘मला त्यांच्या मुखात पोकळी दिसली आणि त्या पोकळीत सर्व ब्रह्मांड सामावले आहे’, असे मला जाणवले.’

वसंत ऋतू असे सर्व ऋतूंचा राजा ।

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्‍या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना वसंत ऋतुबद्दल सुचलेली कविता येथे देत आहोत.