परात्पर गुरु डॉक्टरांचे अध्यात्मविषयक मार्गदर्शन

‘शारीरिकदृष्ट्या विचार केला, तर वयोमानानुसार माझे विस्मृतीचे प्रमाण वाढत आहे; पण आध्यात्मिकदृष्ट्या मी नेहमी वर्तमानकाळात रहात असल्यामुळे मला भूतकाळातील काही आठवत नाही आणि भविष्यात स्थापन होणार्‍या हिंदु राष्ट्राचा विचारही माझ्या मनात येत नाही.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘एखाद्या व्यक्तीच्या जीवनात असे का घडते ?, तसेच प्रारब्ध, वाईट शक्ती, सात्त्विकता इत्यादी शब्दही ज्ञात नसलेले पाश्चात्त्य संशोधन वरवरचे आहे, म्हणजे पोरखेळ आहे ! अशा पाश्चात्त्यांचे हिंदू अनुकरण करतात, हे हास्यास्पद आहे !’ –  (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व !

‘हिंदु धर्मात सांगितले आहे तितके सखोल ज्ञान इतर एकातरी पंथात आहे का ? विज्ञानाला तरी ज्ञात आहे का ?’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सच्चिदानंद ईश्वराची प्राप्ती कशी करायची, हे अध्यात्मशास्त्र सांगते, तर ‘ईश्वर नाहीच’, असे काही  विज्ञानवादी, म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादी ओरडून सांगतात !’ –  (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘विज्ञानाने विविध यंत्रे शोधून मानवाचा वेळ वाचेल असे केले; पण ‘त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा’, हे न शिकवल्याने मानव पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

‘वैयक्तिक जीवनासाठी’ आणि ‘राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी’ वेळ देणे

‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्वजण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाईम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी १ घंटा सेवा करायला कोणीही तयार नसतो !’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘निरक्षराने ‘सर्व भाषांतील अक्षरे सारखीच असतात’, असे म्हणणे, जसे म्हणणार्‍याचे अज्ञान दाखवते, त्याचप्रमाणे ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे त्यांचे अज्ञान दाखवतात. ‘सर्व औषधे, सर्व कायदे सारखेच आहेत’, असे म्हणण्यासारखे ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणे आहे.’

‘सनातन प्रभात’च्या ज्ञानशक्तीचा परिपूर्ण लाभ घ्या !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश – जगातील कुठल्याही नियतकालिकामध्ये असे अध्यात्म शिकवणारे लेखन उपलब्ध होणार नाही. ‘सनातन प्रभात’मधील ‘साधना’ आणि ‘अध्यात्म’ या विषयांच्या लेखांचे नियमित वाचन केल्यास वाचकांमध्ये निश्चितच आध्यात्मिक दृष्टी आणि साधकत्व निर्माण होईल !

संतांनी समष्टी प्रसारकार्य करण्यामागील कारण !

‘आधीच्या युगांत प्रजा सात्त्विक असल्याने ऋषींना समष्टी प्रसारकार्य करावे लागायचे नाही. आता कलियुगात बहुतेक साधना करत नसल्याने संतांना समष्टी प्रसारकार्य करावे लागते !’

स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाचे महत्त्व !

ईश्‍वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे.