परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सत्ययुगात नियतकालिक, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींची आवश्यकताच नव्हती; कारण वाईट बातम्या नसायच्या आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी होते.’

राष्ट्र-धर्मासाठी आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक !

‘शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर राष्ट्र-धर्मासाठी कार्य करून काही साध्य होत नाही, हे गेल्या ७४ वर्षांत अनेकदा सिद्ध झाले आहे. ‘आता त्यांच्या जोडीला आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक आहे’, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणाऱ्या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अध्यात्माविषयी मार्गदर्शन

‘व्यवहारामध्ये ‘कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये’, असे सांगितले जाते; परंतु अध्यात्मात साधनेसाठीच्या प्रयत्नांचा जितक्या प्रमाणात अतिरेक करू, त्याचा अधिकाधिक लाभच होत जातो …

ऋषींचे श्रेष्ठत्व !

‘कुठे यंत्रांद्वारे संशोधन करून पालटते निष्कर्ष सांगणारे वैज्ञानिक, तर कुठे लाखो वर्षांपूर्वी यंत्रांविना आणि संशोधनाविना अंतिम सत्य सांगणारे ऋषि !’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अध्यात्माविषयी मार्गदर्शन

‘अध्यात्म हे अनंताचे शास्त्र असल्यामुळे ते इतरांना शिकवण्यात वेळ घालवण्यापेक्षा ते शिकण्यासाठी वेळ द्यावा. मी आयुष्यभर केवळ शिकण्यालाच महत्त्व दिले आहे.’

बुद्धीप्रामाण्यवाद्यांसंदर्भातील शोकांतिका !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना जिज्ञासा नसल्याने ते स्वतःला आहे तेवढ्या छोट्याशा ज्ञानात (अज्ञानात) रहातात. त्यांना पुढचे पुढचे काहीच कळत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

राजकारणी आणि सांप्रदायिक यांच्यातील भेद !

‘स्वार्थासाठी राजकीय पक्ष पालटणारे सहस्रो असतात; पण स्वार्थत्यागी सांप्रदायिकांच्या मनाला संप्रदाय पालटण्याचा विचार एकदाही शिवत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

देव आणि मानव यांच्यातील भेद !

‘देव जमीन, पाणी, हवा इत्यादी सर्व फुकट देतो. मानव मात्र प्रत्येक गोष्ट विकत देतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

स्वराज्य हे सुराज्य नसते !

‘स्वराज्य हे सुराज्य नसते. याचे कारण हे की, रज-तमप्रधान लोकांचे स्वराज्य कधी सुराज्य नसते. भारताने हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची ७४ वर्षे अनुभवले आहे.’