परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘साधना केल्यावर कुंडलिनी शक्ती जागृत होते, हे आतापर्यंतच्या युगांत लाखो साधकांनी अनुभवले आहे; पण साधनेवर विश्वास नसणारे बुद्धीप्रामाण्यवादी साधना न करता म्हणतील, ‘कुंडलिनी दाखवा, नाहीतर ती नाहीच !’

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वेगळेपण !

‘त्याग करायला एक तरी दैनिक शिकवते का ? केवळ ‘सनातन प्रभात’ शिकवते. त्यामुळे ‘सनातन प्रभात’च्या वाचकांची अध्यात्मात प्रगती होते, तर इतर दैनिकांचे वाचक मायेत अडकतात.’  

आगामी काळासाठी मालीश, बिंदुदाबन यांसारख्या उपचारपद्धती प्रत्येकानेच शिकणे आवश्यक !

आगामी आपत्काळात डॉक्टर, वैद्य आणि औषधे इत्यादि उपलब्ध होणे कठीण असणार. अशा वेळी रुग्णाला आराम मिळण्यासाठी बिंदुदाबन, मालीश यांसारख्याच उपचारपद्धती उपयोगी पडणार आहेत. या परिस्थितीला कोणालाही सामोरे जावे लागू शकते.

प्रत्येक पिढीचे कर्तव्य !

‘प्रत्येक पिढी पुढील पिढीकडे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात अपेक्षेने पहाते. याऐवजी प्रत्येक पिढीने ‘आम्हाला काय करता येईल ?’, असा विचार करून असे कार्य केले पाहिजे की, पुढच्या पिढीला त्यांसंदर्भात काही करण्याची आवश्यकता न उरल्याने ती सर्व वेळ साधनेला देऊ शकेल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘माणूस सोडून कोणताही प्राणी अथवा वनस्पती सुटी घेत नाही. देवही एक सेकंदाची सुटी घेत नाही. माणूस मात्र शनिवार आणि रविवार सुटी घेतो.

मानसिक नव्हे, तर केवळ शारीरिक प्रेम असणारे हल्लीचे पती-पत्नी !

‘हल्लीच्या काळातील स्त्री-पुरुषांमधील प्रेम बहुदा केवळ शारीरिक प्रेम असते. त्यामुळे त्यांना लग्न करायचीही आवश्यकता वाटत नाही आणि त्यांनी लग्न केले, तर ते टिकत नाही. त्यांचे एकमेकांशी पटले नाही, तर ते मानसिक प्रेम नसल्याने जोडीदार बदलत रहातात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘धर्म त्याग शिकवतो, तर राजकारण स्वार्थ शिकवते; म्हणून भ्रष्टाचार इत्यादी प्रकार वाढत गेले आहेत. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सर्वांना सर्वस्वाचा त्याग शिकवणारी साधना शिकवणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

व्यष्टी साधना चांगली होण्यासाठी कुलदेवतेची उपासना उपयुक्त 

परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांची मर्यादा !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मानवाने निरनिराळी यंत्रे शोधली’, याचा अहंकार असतो. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, ईश्वराने जिवाणू, पशू, पक्षी, ७० – ८० वर्षे चालणारे एक यंत्र, म्हणजे मानवी शरीर यांच्यासारख्या अब्जावधी गोष्टी बनवल्या आहेत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉक्टरांचे राष्ट्राविषयी मार्गदर्शन !

अनेक राजकारणी त्यांच्या राजकीय पक्षाने त्यांना उमेदवारी नाही दिली, तर तो राजकीय पक्ष सोडून उमेदवारी देणार्‍या अन्य राजकीय पक्षात जातात. अशा पक्षनिष्ठा नसणार्‍या राजकारण्यांमध्ये देशनिष्ठा किती असणार ?