परिपूर्ण आणि एकमेवाद्वितीय हिंदु धर्म !

‘केवळ हिंदु धर्माच्या ग्रंथांत विश्वाची रचना, अणू-परमाणू, अदृश्य सृष्टी, पाप-पुण्य, वाईट शक्तींचा त्रास कसा दूर करायचा, ईश्वरप्राप्ती कशी करायची इत्यादींची संपूर्ण माहिती दिली आहे. इतर काही धर्मांत त्यांचा उल्लेख असल्यास केवळ तो शब्दापुरता केला आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्माचे सर्वश्रेष्ठत्व !

‘हिंदु धर्म ‘ईश्‍वरप्राप्ती कशी करायची’, हे शिकवतो, तर इतर धर्म दुसर्‍यांवर आक्रमण करून त्यांना त्यांचा धर्म स्वीकारण्यास भाग पाडतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अशांना सीमेवर लढण्यास पाठवले पाहिजे !

‘हिंदू-मुस्लिम भाई-भाई’ किंवा ‘हिंदू-चिनी भाई-भाई’, असे म्हणणार्‍यांना भारत-पाक किंवा भारत-चीन सीमारेषांवर लढण्यास पाठवले पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

देवतांच्या संदर्भातील कथा त्यातून शिकण्यासाठी वाचा !

‘देवतांच्या संदर्भातील कथांमधून शौर्य, पराक्रम, ज्ञान, भक्ती, नीती यांसारखे अनेक पैलू शिकायला मिळतात. हे सर्व शिकण्याच्या उद्देशाने देवतांच्या कथा वाचल्या, तर आपल्यात त्या देवतेबद्दल भाव जागृत होण्यास साहाय्य होऊ शकते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

चीनपासून सा‍वध राहिल्यासच भारताचे महासत्ता बनणे शक्य !

‘‍वर्ष १९७१ च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानच्या साहाय्यासाठी नौसेना पाठवू इच्छिणार्‍या चीनचा कपटी कावा लक्षात ठेवून अर्थकारणाची पावले उचलल्यासच भारत महासत्ता बनू शकेल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारतीय हिंदूंनी हे कदापि विसरू नये !

‘जगातील एकमेव हिंदु राष्ट्र असणार्‍या नेपाळला चीनमुळे साम्यवादी बनवण्यात आले. हे देशातील हिंदूंनी कदापी विसरू नये.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

चीनधार्जिण्यांना भारतात रहाण्याचा अधिकार नाही !

‘१९६२ च्या युद्धात भारताची भूमी चीनने बळकावली, हा राष्ट्रीय अपमान आहे. हे विसरणार्‍यांना देशात रहाण्याचा अधिकार आहे काय ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

चीनचा कळवळा असणाऱ्यांनो, हे लक्षात घ्या !

‘हिंदू-चिनी भाई-भाई’, असे म्हणणारे चीनच्या आक्रमणात मृत्यू पावले, तर कोणास दु:ख का वाटावे ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्रात भारतीय भाषांनाच प्राधान्य असेल !

‘हिंदूंनो, मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांत घालू नका; कारण हिंदु राष्ट्रात भारतीय भाषा या शाळेतील आणि सरकारी कारभाराचे माध्यम असतील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

देवाचे वैशिष्ट्य आणि मनुष्याची मर्यादा !

‘देवाने मनुष्याला बनवले, जो त्याच्याशी परत एकरूप होऊ शकतो. मनुष्याने अनेक गोष्टी निर्माण केल्या; पण त्यातील एकही परत मनुष्याशी एकरूप होऊ शकत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले