ईश्‍वरप्राप्तीसाठी अनावश्यक ठरणारी हल्लीची शिक्षणपद्धती !

हल्लीच्या शिक्षणामध्ये ‘नामजप, सत्सेवा यांसारख्या आध्यात्मिक कृती शिकवल्या जात नाहीत. जे काही शिक्षण दिले जाते, त्याने आध्यात्मिक उन्नती होऊच शकत नाही. थोडक्यात शालेय शिक्षणात ईश्‍वरप्राप्तीच्या दृष्टीने अनावश्यक कृती शिकवल्या जातात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाची मर्यादा आणि अध्यात्माचे अलौकिकत्व !

‘विज्ञान मानवी जीवन सुखी करण्यासाठी आहे, तर अध्यात्म मानवी जीवन आनंदी करण्यासाठी आणि ईश्वरप्राप्ती करून देणारे आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गांधीवाद्यांची आत्मघातकी अहिंसा !

‘राम आणि कृष्ण यांच्या युगांत गांधीवादी असते, तर त्यांनी राम-कृष्ण यांनाही अहिंसावाद शिकवण्याचा प्रयत्न केला असता आणि रावण अन् कंस यांना जिवंत ठेवले असते. त्यामुळे हिंदू नष्टच झाले असते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्मकार्य करण्याचे अलौकिक महत्त्व !

‘एखाद्या जातीचे किंवा पंथाचे कार्य करणार्‍यांचे, म्हणजे जात्यंधांचे, पंथांधांचे कार्य तात्कालिक असते. धर्माचे मानवजातीसाठीचे कार्य स्थळ आणि काळ यांची मर्यादा ओलांडून पुढे जाते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रेमाने दीर्घकाळ टिकणारे सुख मिळते, तर शारीरिक संबंधांमुळे तात्कालिक सुख मिळते !

‘पूर्वी मानसिक स्तरावरील प्रेम आधी असे आणि मग शारीरिक संबंध होत असत; परंतु आता अनेक पाश्‍चात्त्य देशांमध्ये शारीरिक संबंध आधी होऊन पुढे जमले, तर दोघांमध्ये मानसिक प्रेम निर्माण होते. यामुळे आताच्या पिढ्यांना तात्कालिक सुख आणि दीर्घकाळ दुःख भोगावे लागत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पाश्चात्त्य संस्कृती स्वीकारून विनाशाच्या खाईत चाललेला समाज !

. . . हिंदूंनी पाश्चात्त्य संस्कृतीचा अंगीकार केल्यामुळे २ पिढ्यांतील, म्हणजेच आई-वडील अन् मुलगा-सूनही एकमेकांशी समरस होऊ शकत नाहीत. आता नवरा-बायकोचेही एकमेकांशी पटत नाही. लग्नानंतर अल्प कालावधीतच त्यांचा घटस्फोट होतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

इंग्रजी भाषेची मर्यादा जाणा !

‘संपूर्ण जगात आज कुठेही गेलो, तर या भूतलावरील विविध विषय इंग्रजी भाषेतून शिकता येतात. त्यामुळे सर्वत्र इंग्रजी भाषेला महत्त्व आले आहे. सर्व जण ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात. असे असले, तरी मनुष्यजन्माचे मूळ ध्येय, म्हणजे ‘ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, हे इंग्रजी भाषेतून शिकता येत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, आतातरी जागे व्हा आणि इतिहासातून धडा घ्या !

‘काही वाईट घडले की, हिंदू प्रत्येक वेळी ‘आपण कुठे न्यून पडलो ?’, याचा विचार न करता इंग्रजांची शिक्षणपद्धत इत्यादींना दोष देतात ! इंग्रज येण्यापूर्वी मुसलमानांनीही भारतावर राज्य केले. ‘यांना इंग्रज नाहीत, तर हिंदूंची चुकीची विचारसरणी कारणीभूत आहे !’, हे ते लक्षात घेत नाहीत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ऋषी-मुनींवरील ‘कृपा’ !

‘वेद-उपनिषदे लिहिणारे ऋषी-मुनी पूर्वीच्या सात्त्विक काळात होऊन गेले, ते बरे झाले; कारण सध्याच्या तामसिक काळात (कलियुगात) त्यांना कुणीच किंमत दिली नसती.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राजकारणी आणि संत यांच्या कार्यातील भेद !

‘राजकारण्यांकडून स्थुलातून अनुभव येतात, उदा. पूरग्रस्तांना साहाय्य करणे, साधनसुविधा उपलब्ध करून देणे, तर संतांकडून सूक्ष्म स्तरावरील उपायांमुळे अनुभव येतात, उदा. अनेकांच्या कौटुंबिक अडचणींसह शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि आध्यात्मिक अडचणी दूर होतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले