सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून हत्येतील संशयित पसार !

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात हत्येच्या प्रकरणात संशयित म्हणून अटक करण्यात आलेला आरोपी सुनील ज्ञानेश्वर राठोड हा ३१ जुलै या दिवशी सकाळी ७ वाजता वैरण अड्डा येथील भिंतीवरून उडी मारून पसार झाला आहे.

‘मुंबै बँके’चे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे अचानक त्यागपत्रे !

राज्यात सत्तापालट होऊन भाजपप्रणीत सरकार स्थापन होताच मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (‘मुंबै बँके’चे) अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि उपाध्यक्ष विठ्ठल भोसले यांनी अचानक पदांची त्यागपत्रे दिली आहेत. या पदांसाठी ५ ऑगस्ट या दिवशी होणार्‍या संचालक मंडळाच्या बैठकीत निवड होणार आहे.

सांगली येथील प्रतापसिंह उद्यानात भारत-पाक युद्धातील रणगाडा बसवण्यात येणार !

वर्ष १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वपूर्ण कामगिरी केलेला रणगाडा सांगलीत आणण्यात आला आहे. रंगरंगोटी करून तो प्रतापसिंह उद्यानात बसवला जाणार आहे. उद्यानात शिवसृष्टीही साकारली जाईल.

प्रत्येक शेतकर्‍याचा जीव मोलाचा असल्याने त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

आम्ही अतीवृष्टीचा आढावा घेतला आहे. पावसामुळे मृत्यू झालेल्यांना साहाय्य करण्याविषयी आढावा घेतला. शेतपिकांची हानी झालेल्यांना हानीभरपाई देऊ. नवीन शिवसेना-भाजप युतीचे सरकार शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही. शेतकर्‍यांना दिलासा देणारा निर्णय घेऊ.

अमरावती येथे ५०० रुपयांच्या बनावट नोटा सिद्ध करणारा विद्यार्थी पोलिसांच्या कह्यात !

परतवाड्यातील इयत्ता अकरावीत शिकणार्‍या विद्यार्थ्याने वडिलांच्या शिकवणीवर्गाच्या कार्यालयातील संगणक आणि प्रिंटर यांचा वापर करून ५०० रुपयांच्या बनावट नोटा सिद्ध केल्या आणि त्या चलनातही आणल्या.

बदलापूर ते ठाणे मधील रेल्वे स्थानकांवर भ्रमणभाष चोरणार्‍यास अटक !

बदलापूर ते ठाणे या मार्गातील रेल्वे स्थानकांवर गर्दीच्या वेळेत प्रवाशांच्या जवळील भ्रमणभाष सराईतपणे चोरणारा अनिलकुमार वर्मा याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी १ लाख ८० सहस्र रुपयांचे १६ भ्रमणभाष जप्त केले आहेत.

५ सहस्र रुपयांमध्ये लॅपटॉपचे आमीष दाखवून तरुणाची फसवणूक !

पैसे भरण्याविषयी तरुणाला पे.टी.एम्. आणि आयसीआयसीआय बँकेच्या ॲपद्वारे प्रक्रिया करण्यास सांगितले होते. उंड्री येथील या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक पुढील अन्वेषण करत आहेत.

संजय राऊत यांच्यावर स्वप्ना पाटकर यांना धमकी दिल्याचा गुन्हा नोंद होणार  ! – किरीट सोमय्या, भाजप नेते

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर स्वप्ना पाटकर यांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात येणार आहे, असे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले. या प्रकरणी सोमय्या यांनी ३१ जुलै या दिवशी वाकोला पोलिसांची भेट घेतली होती. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील ४८ इमारतींचा अनधिकृत भाग पाडण्याचा न्यायालयाचा आदेश !

महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम होऊनही त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई व्हायला हवी !

सर्वोच्च न्यायालयातील शिवसेनेच्या याचिकेवर ३ ऑगस्ट या दिवशी सुनावणी !

शिवसेना पक्षावर कुणाचा दावा खरा आहे, हे पहाण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गट यांला नोटीस बजावली होती. या नोटिशीला स्थगिती देण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट केली आहे.