‘मॉल’ : लाभ कि हानी ?

मॉल’ची व्याख्या करतांना ‘अनावश्यक खर्च करण्याचे खात्रीलायक स्थान’ असा विचार येऊन जातो ! त्यामुळे पुढे येणार्‍या आपत्काळाच्या दृष्टीने आपण प्रत्येक जण आपल्याला जेवढे आवश्यक आहे, तेवढीच खरेदी करण्याची सवय लावूया !

स्तुत्य निर्णयावर योग्य कार्यवाही हवी !

शासनाने चांगला निर्णय घेतला, तरी त्याची कार्यवाही करण्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आणि वाळूमाफियांची लुडबूड न होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला नको.

सांप्रतकाळी बलोपासना आवश्यक !

समर्थांनी ११ ठिकाणी मारुति मंदिरांची स्थापना केली. भक्तीबरोबरच शक्तीचीही उपासना अर्थात् बलोपासना करण्याचे महत्त्व त्यांनी समाजमनावर बिंबवले. मन, मनगट आणि मेंदू बळकट असायला पाहिजे, हे त्यांनी स्वानुभवातून जाणले.

‘दंगलखोर’ मोकाट का ?

प्रशासनाला दंगलखोरांवर ‘योगी आदित्यनाथ’ यांच्याप्रमाणे तात्काळ कारवाई करणे अवघड नाही. प्रशासनाने दंगलखोरांवर लवकरच वचक बसवावा, हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा !

‘उप’जीविका ‘मुख्य’ नाही !

मनुष्यजन्माचा खरा उद्देश ‘ईश्वरप्राप्ती’ हा आहे. ईश्वरप्राप्ती करण्यासाठी साधना अनिवार्य आहे. मनुष्यजन्माच्या खर्‍या उद्देशपूर्तीसाठी अधिकाधिक वेळ वापरला जाणे आवश्यक असतांना उपजीविकेसाठी अधिकाधिक वेळ दिला जात आहे.

शेतकर्‍याला वाली कोण ?

नागरिकांच्या हिताच्या अनेक योजना शासनाच्या वतीने राबवल्या जातात; मात्र ‘भ्रष्टाचार’रूपी किडीमुळे त्यांची प्रभावी कार्यवाही होतांना दिसत नाही. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आपण देश ‘भ्रष्टाचारमुक्त’ करू शकलो नाही, हे सर्वांनाच लज्जास्पद आहे !

शाळांना आर्थिक साहाय्य कधी मिळणार ?

सर्वच शाळांची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे शासनानेही अनुदानाची रक्कम वेळेत शाळेकडे वर्ग करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे.

सोलापूर शहर बससेवेच्या प्रतीक्षेत !

सोलापूर शहरात महापालिकेच्या शहर परिवहन उपक्रमातील ९९ नव्या कोर्‍या सिटी बसेसच्या चेसी क्रॅक असल्याने त्या जागेवरच थांबून भंगार झाल्या आहेत.

मंगळसूत्रातील वाट्यांना बगल नको !

‘फॅशन’ म्हणून आपण धर्मशास्त्रीय संकल्पनेत मनमानी पालट केले, तर ते योग्य होणार नाहीत. त्यामुळे वाट्यांविरहित मंगळसूत्रांना ‘मंगळसूत्र म्हणायचे कि मंगळसूत्रसदृश गळ्यातील अलंकार ?’, हाही एक प्रश्न आहे.

प्रशासन संवेदनशील हवे !

अवेळी पावसामुळे लाखो हेक्‍टर क्षेत्रातील पिकांची हानी झाल्‍याचा प्राथमिक अंदाज आहे. अवेळी पावसाचे थैमान चालू असतांना सरकारी सेवक जुन्‍या निवृत्तीवेतनाच्‍या मागणीसाठी संपावर होते.