महिलांनो, योग्‍य कृती करा !

महाराष्‍ट्राचा किंबहुना भारताचा इतिहास पाहिल्‍यास राष्‍ट्रासाठी लहान वयात प्राण देणार्‍या महाराणी आणि क्रांतीकारी महिला यांचा वारसा आहे. याची जाणीव वाढणे आवश्‍यक आहे.

गुन्‍हेगारांवर ‘वचक’च हवा !

चोरी, घरफोडी, तसेच जबरी चोरी करणार्‍या सराईतांनाही पकडल्‍यानंतर त्‍यांना गंभीर शिक्षा न झाल्‍याने ‘काही होत नाही’, या अविर्भावात गुन्‍हेगार पुन्‍हा गुन्‍हे करत आहेत.

कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती !

कलेचे बाजारीकरण न करता अध्यात्मीकरण कसे करता येईल, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. ‘कलेसाठी कला’ न रहाता ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ असे होऊन त्याचा स्वतःसह समाजालाही लाभ होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

छत्रपती संभाजीनगर नामांतराचे समर्थन करा !

शासनाने जनतेला २७ मार्चपर्यंत नामांतराविषयीचे आक्षेप सरकारी कार्यालयात नोंदवायला सांगितले आहेत. हा आक्षेप नोंदवण्यातील अर्जांची संख्या २३ मार्चपर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ ४५०, तर विरोधात ७० सहस्रांहून अधिक अर्ज आलेले आहेत.

दुधात भेसळ का ?

जेव्‍हा भेसळ झाल्‍याचे एखादे प्रकरण सापडते, त्‍या वेळी त्‍यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होते, विषयाचे गांभीर्य वाढले आहे, असे वाटते; परंतु पुन्‍हा काही नाही, अशी स्‍थिती असते. समस्‍या खर्‍या अर्थाने सुटण्‍यासाठी तिच्‍या मुळाशी जाणे आवश्‍यक आहे !

जीवघेणा ‘डीजे’ टाळा !

विदेशातून संगीतप्रेमी भारतात येऊन भारतीय संगीत शिकत आहेत; पण आपण ‘डीजे’च्‍या मागे लागून स्‍वतःची हानी करून घेत आहोत; म्‍हणून सामाजिक, तसेच आध्‍यात्मिक हानी करणार्‍या या ‘डीजे’सारख्‍या वाद्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी.

विद्यार्थी घडणारे शिक्षण हवे !

प्राचीन काळी भारतामध्ये गुरुकुल शिक्षणव्यवस्थेतून घडलेले प्रतिभासंपन्न विद्यार्थी राष्ट्रउभारणीत मोठे योगदान द्यायचे. याउलट सध्याच्या शिक्षणव्यवस्थेत विद्यार्थी मानसिक रुग्ण बनत चालला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खर्‍या अर्थाने घडण्याचे शिक्षण देणे आवश्यक आहे.

‘भक्ती’चेच कवच हवे !

महिलांनी स्वतःतील ‘शक्ती’ जागृत करण्याची वेळ आली आहे. यासाठी ‘धर्माचरण करून भक्ती वाढवणे’ आवश्यक आहे. प्रत्येक स्त्रीने सर्व गोष्टींसमवेत स्वतःतील भक्ती वाढवणे आवश्यक आहे. भक्तीचे कवच कुणीही भेदू शकणार नाही, हे नक्की !

‘जंगली रमी’चे भयावह वास्‍तव !

या समस्‍येकडे गांभीर्याने पाहून हे सर्व कसे थांबेल यांसाठी धोरणात्‍मक निर्णय घेणे आवश्‍यक आहे, तसेच जुगाराविषयी जाहीरपणे समर्थन करणार्‍या मंडळींवरही कडक वचक बसवणेही तितकेच आवश्‍यक आहे. हीच सूज्ञ जनतेची अपेक्षा !

भारतीय वाहनांची नावे स्‍वदेशीच हवी !

‘नावात काय’ म्‍हणून सोडून न देता ‘नावातच सगळे आहे’, हे लक्षात घेऊन स्‍वदेशी आस्‍थापनांनी तरी किमान आपल्‍या वाहनांना स्‍वदेशी नावे द्यावीत. या छोट्या; पण महत्त्वाच्‍या प्रयत्नातून स्‍वभाषेला आणि पर्यायाने राष्‍ट्राला ऊर्जितावस्‍था प्राप्‍त होण्‍यास साहाय्‍य होणार आहे.