कोकणची काशी श्रीक्षेत्र कुणकेश्वरची यात्रा !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील श्रीक्षेत्र कुणकेश्वरला ‘कोकणची काशी’ असे संबोधतात. अशा या श्री देव कुणकेश्वराची यात्रा १८ ते २० फेब्रुवारी २०२३ या कालावधीत होणार आहे. या पवित्र स्थानाची संक्षिप्त माहिती प्रस्तुत लेखात देत आहोत.

सूर्यदेवाचे माहात्‍म्‍य !

माघ शुक्‍ल सप्‍तमी हा दिवस सर्व भारतात ‘रथसप्‍तमी’ म्‍हणून मानला गेला असून या दिवशी सर्वत्र भक्‍तीभावाने सूर्यपूजन होत असते. हा मन्‍वंतराचा पहिला दिवस असून या दिवशी भगवान सूर्यनारायण ७ घोडे जुंपलेल्‍या नवीन रथातून मार्ग आक्रमण करत असतो.

गणेशाच्‍या निरनिराळ्‍या अवतारांतील त्‍याची नावे आणि कार्य

आपल्‍या संस्‍कृतीत श्री गणेश आणि सरस्‍वती या देवतांचे ‘बुद्धीदायी देवता’ असे वर्णन आहे; परंतु त्‍यांची कार्ये भिन्‍न आहेत. गणेशाच्‍या कृपाप्रसादाने बुद्धी आणि ज्ञान वाढते, तर सरस्‍वतीच्‍या उपासनेने मिळालेले ज्ञान शब्‍दरूपात व्‍यक्‍त करता येते; म्‍हणून तिला ‘वाक्‌विलासिनी’, असे म्‍हटले आहे. गणेशाच्‍या विविध अवतारांतील त्‍याचे नाव आणि कार्य येथे देत आहोत.

मकरसंक्रांतीचे महत्त्व

मकरसंक्रांत ते रथसप्‍तमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. या पर्वकाळी केलेले दान आणि पुण्‍यकर्मे विशेष फलद्रूप होतात.

गोवर्धनगिरिधारी श्रीकृष्ण !

भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून धरून इंद्राच्या कोपापासून गोकुळवासियांचे रक्षण केले. ‘आपला अन्नदाता आणि रक्षणकर्ता गोवर्धन पर्वतच आहे’, याची सर्वांना खात्री पटली अन् त्यांची श्रीकृष्णावरील भक्तीही वाढली. शेवटी इंद्र थकला आणि त्याने वृष्टी बंद केली. पुन्हा सर्व लोक गोकुळात आले.

यमद्वितीयेचे रहस्य !

‘कार्तिक शुक्ल द्वितीया हा दिवस ‘यमद्वितीया’ या नावाने भारतवर्षांत प्रसिद्ध आहे. त्या निमित्ताने…

धर्म-राष्ट्र जागृती करणारा ‘सनातनचा आकाशकंदिल’

हिंदूंमध्ये धर्म आणि राष्ट्र यांच्याप्रती जागृती निर्माण होण्याची आवश्यकता आहे. असे झाले तरच दिवाळी ही खर्‍या अर्थाने साजरी होऊ शकेल. हाच संदेश सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी ‘सनातन संस्था’ धर्मजागृती आणि राष्ट्रजागृती करणारे लिखाण असलेल्या आकाशकंदिलाची निर्मिती करते.

देवदिवाळी

आपले कुलदैवत आणि इष्टदेवता यांच्याबरोबरच स्थानदेवता, वास्तूदेवता, ग्रामदेवता आणि गावातील अन्य मुख्य अन् उपदेवता यांचे, तसेच महापुरुष, वेतोबा इत्यादी निम्नस्तरीय देवता यांचे पूजन करून त्यांना त्यांच्या मानाचा भाग पोचवण्याचे कर्तव्य या दिवशी पार पाडले जाते. देवदिवाळीला पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो.

दीपावलीचे महत्त्व

‘दिवाळी’ हा शब्द ‘दीपावली’ या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात.

लक्ष्मीपूजन

‘प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध, ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा या दिवसाचा विधी आहे.