हलाल प्रमाणित उत्पादनांवर देशभरात बंदी आणावी, तसेच अयोध्यानगरी मद्य-मांस मुक्त करावी !

आर्णी आणि कारंजा (लाड) येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी !

विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसेल, असे आरक्षण आम्ही देऊ,असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले.

बालसंरक्षण हे प्रत्येक नागरिकांचे दायित्व ! – जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे  

लैंगिक छळवणूक, छेडछाड अश्लिलता, कूकर्म, अत्याचार, बलात्कार या गोष्टींपासून बालकांचे संरक्षण व्हावे, याकरता अत्याचार करणार्‍या गुन्हेगाराला जन्मठेप अथवा फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे.

अधिसूचनेमध्ये पालट करून घरबांधणी आणि घरदुरुस्ती अनुमती ग्रामपंचायतीकडे देण्याच्या अनुषंगाने तात्काळ शासन निर्णय काढावा ! – आमदार डॉ. राजन साळवी

नागरिकांना अनुमती घेण्याकरता गावातून तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सतत फेर्‍या माराव्या लागत आहेत.

मराठवाड्याला नेहमीच हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष का करावा लागतो ? – अंबाबास दानवे, विरोधी पक्षनेते

‘सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे मराठवाडयाला हक्काचे पाणी मिळावे’, अशी शासनाची भूमिका आहे आणि त्याप्रमाणे योग्य ती कार्यवाही केली जाईल.

राज्यात पोलीस भरतीमध्ये आरक्षण लागू होण्याची शक्यता !

अन्य शासकीय पदांच्या भरतीमध्ये चक्रीपद्धतीने आरक्षण आहे. पोलीस भरती मात्र वांशिकपद्धतीने केली जात आहे. पोलीस पाटील असलेल्या व्यक्तीच्या पुढील पिढीतच या पदाची नियुक्ती होते.

अल्पवयीन युवतींच्या अत्याचार प्रकरणात विशेष सरकारी वकील लवकर नेमा ! – नीलम गोर्‍हे, उपसभापतींचे निर्देश

अनेक प्रकरणांमध्ये अल्पवयीन युवतींच्या अत्याचार प्रकरणांत कार्यकर्ते पीडितेच्या घरी भेटायला जातात. त्या प्रसंगी कार्यकर्त्यांनी आधार दिल्यावर पीडिता जबाब देण्यास सिद्ध होते. प्रत्यक्षात खटला चालू झाल्यावर पीडिता ‘कार्यकर्त्याने सांगितल्यामुळे मी तसा जबाब दिला’, असे सांगते.

साहाय्यक निबंधक यांच्या अन्वेषण अहवालानुसार कारवाई करू ! – दिलीप वळसे-पाटील, सहकारमंत्री

अमरावती जिल्ह्यातील जिजाऊ कमर्शियल को-ऑप. बँकेच्या संचालक मंडळाने नियमबाह्य पद्धतीने कर्जाचे वाटप केले. या प्रकरणी   सखोल अन्वेषणासाठी सहकार आयुक्तांनी साहाय्यक निबंधकांची ‘प्राधिकृत अधिकारी’ म्हणून नियुक्ती केली असून अन्वेषणाची कार्यवाही चालू आहे.

मालेगाव येथील विद्यार्थ्यांच्या धर्मांतराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी ! – आमदार राहुल ढिकले, भाजप, नाशिक

नाशिकमधील मालेगाव येथील एम्.एस्.जी. महाविद्यालयात करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली हिंदु विद्यार्थ्यांना एका विशिष्ट धर्माची माहिती देऊन त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

महाराष्ट्रात नवीन तालुक्यांची निर्मिती होणार, आकृतीबंध निश्चित ! – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राज्यात स्वतंत्र तालुक्यांच्या निर्मितीसाठी होत असलेल्या मागण्यांविषयी शासन सकारात्मक आहे. मोठ्या, मध्यम आणि छोट्या तालुक्यांसाठी किती पदे असावीत ? याचा आकृतीबंध निश्चिती करण्यात आला आहे.