३ जानेवारी या दिवशी अयोध्येसाठी ३, तर वालंकिणीसाठी १ रेल्वे जाणार !

पणजी, २८ डिसेंबर (वार्ता.) – राज्य सरकारच्या समाज कल्याण खात्याच्या अंतर्गत चालू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री देवदर्शन’ योजनेच्या अंतर्गत ३ जानेवारीपासून गोमंतकीय जनतेला अयोध्या येथे रामलल्ला आणि त्याचबरोबर केरळमधील वालंकिणीचे दर्शन घेता येणार आहे. या योजनेच्या अंतर्गत ३ जानेवारी या दिवशी अयोध्येसाठी ३, तर वालंकिणीसाठी १ रेल्वे सोडण्यात येणार आहे. याचा अनुमाने ३ सहस्र ५०० गोमंतकियांना लाभ होणार आहे आणि यावर अनुमाने ७ कोटी ५० लक्ष रुपये खर्च होणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी ‘ऑनलाईन’ पद्धतीने नोंदणी करावी, असे आवाहन समाज कल्याण खात्याचे संचालक दीपक देसाई यांनी केले आहे.
सरकार ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य देवदर्शन घडवून आणण्यासाठी ही योजना राबवते. या योजनेच्या अंतर्गत यापूर्वी शिर्डी, पंढरपूर, वालंकिणी आदी ठिकाणी रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. या योजनेचा आतापर्यंत सहस्रो गोमंतकियांनी लाभ घेतला आहे. काही वर्षांपासून निधीअभावी ही योजना बंद ठेवण्यात आली होती. सध्या सरकारने योजनेसाठी आवश्यक निधी दिल्याने आता ही योजना पुन्हा चालू करण्यात आली आहे. या वेळी योजनेत काही पालट करण्यात आले आहेत. यापूर्वी योजनेचा अर्ज इच्छुकांना प्रत्यक्ष भरावा लागत होता; मात्र या वेळी इच्छुकांना ६-७ दिवस आधीपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. या वेळी समाज कल्याण खाते आणि गोवा पर्यटन विकास महामंडळ संयुक्तपणे ही योजना राबवणार आहे.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान