
सोलापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी यांनी नुकतेच श्री तुळजाभवानीदेवी आणि पाचवे ज्योतिर्लिंग असलेले प्रभु वैद्यनाथ यांचे भक्तीभावाने दर्शन घेतले. सकाळी जशोदाबेन मोदी आणि त्यांचे चुलत बंधू अशोक मोदी तुळजापूर येथे आले. कोणतीही ओळख न सांगता त्यांनी साधेपणाने श्री तुळजाभवानी मातेची पूजा आणि आरती केली. पुजारी सचिन वसंतराव अमृतराव यांनी पूजेचे पौरोहित्य केले. या वेळी जशोदाबेन मोदी यांनी मातेचरणी फुले अर्पण करून देशाच्या सुख-समृद्धी आणि कल्याण यांसाठी प्रार्थना केली. दर्शनानंतर पुजार्यांनी मातेच्या प्रतिमा भेट देऊन मोदी परिवाराचा सन्मान केला. यानंतर जशोदाबेन मोदी यांनी परळी वैजनाथ येथे असलेल्या श्री वैद्यनाथ मंदिरात कुटुंबासह दर्शन घेतले. हे मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे असून आरोग्य रक्षणासाठी विशेष महत्त्वाचे मानले जाते. देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात.
या वेळी जशोदाबेन मोदी यांनी दर्शनासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेविषयी प्रशासनाचे आभार मानले. संपूर्ण दौर्यात त्यांनी श्रद्धा, साधेपणा आणि धार्मिक परंपरा यांप्रती आदर व्यक्त केला.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान