
नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहांची संख्या एकूण ४४९ आहे. मुलांची वसतीगृहे २३१ आहेत, तर मुलींची वसतीगृहे २१८ आहेत. या मुलांच्या आहारात सुधारणा करण्याचा नेहमी प्रयत्न करत आहोत. राज्यात काही वसतिगृहांत काही वेळा जेवणाची चव, दर्जा यांत त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या त्रुटी पडताळून संबंधित भोजन पुरवठा करणार्या ठेकेदाराला ५५ लाख रुपयांचा दंड आतापर्यंत आकारला आहे.
यापुढे विद्यार्थ्यांच्या जेवणात त्यांच्या इतर सुविधांमध्ये सरकार कुठेही अल्प पडणार नाही, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी १३ डिसेंबर या दिवशी प्रश्नोत्तरात केले. सदस्य उत्तमराव जानकर यांनी राज्यातील वसतीगृहांतील विद्यार्थ्यांना होत असलेल्या गैरसोयीची माहिती देऊन सभागृहाचे लक्ष वेधले. त्या वेळी ते बोलत होते.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान